मिल्टन ओबोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपोलो मिल्टन ओबोटे (२८ डिसेंबर, १९२४ - १० ऑक्टोबर, २००५) हा युगांडाचा राजकारणी आणि क्रांतिकारी होता. याने युगांडाच्या स्वांतंत्र्यचळवळीत महत्त्वाचा भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात ओबोटे १९६२-६६ दरम्यान पंतप्रधानपदी आणि १९६६-७१ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होता. १९७१मध्ये इदी अमीनचे घडवून आणलेल्या सशस्त्र क्रांतीमध्ये ओबोटेला पदच्युत करण्यात आले. १९७९मध्ये अमीनच्या सत्तात्यागानंतर १९८०-८५ काळात ओबोटे परत युगांडाचा राष्ट्राध्यक्ष होता.