गणपत पाटील
जन्म | १९१८/१९१९ |
---|---|
मृत्यू |
मार्च २३, २००८ कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट |
केला इशारा जाता जाता सोंगाड्या |
पत्नी | प्रेमलाताई |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.imdb.com/name/nm1933131/ |
गणपत पाटील मराठी चित्रपट अभिनेते होते. तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात.
जीवन
[संपादन]गणपत पाटील यांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.
त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.
कारकीर्द
[संपादन]चित्रपट
[संपादन]वर्ष | चित्रपट |
---|---|
१९३८ | बालध्रुव (बालकलाकार, मॉबमध्ये) |
१९४८ | बलिदान |
१९४८ | वन्दे मातरम |
१९४९ | मीठभाकर |
१९५० | राम राम पाव्हणं |
१९५१ | पाटलाचा पोर |
१९५१ | शारदा |
१९५२ | छत्रपती शिवाजी (अनेक भूमिका) |
१९५२ | मायबहिणी |
१९५२ | मायेचा पाझर |
१९५३ | माझी जमीन |
१९५३ | वादळ |
१९५४ | तारका |
१९५६ | गाठ पडली ठकाठका |
१९५६ | पावनखिंड |
१९५७ | नायकिणीचा किल्ला |
१९५९ | आकाशगंगा |
१९६० | शिकलेली बायको |
१९६२ | गावची इज्जत |
१९६२ | प्रीतिविवाह |
१९६२ | सूनबाई |
१९६३ | थोरातांची कमळा |
१९६४ | पाठलाग |
१९६४ | सवाल माझा ऐका |
१९६४ | वाघ्या मुरळी |
१९६५ | केला इशारा जाता जाता |
१९६५ | मल्हारी मार्तंड |
१९६५ | रायगडचा राजबंदी |
१९६७ | बाई मी भोळी |
१९६७ | देवा तुझी सोन्याची जेजुरी |
१९६७ | सांगू मी कशी |
१९६८ | सुरंगा म्हनत्यात मला |
१९६८ | छंद प्रीतिचा |
१९६८ | धन्य ते संताजी धनाजी |
१९६८ | एक गाव बारा भानगडी |
१९६९ | खंडोबाची आण |
१९६९ | गणगौळण |
१९७० | अशी रंगली रात |
१९७० | गणानं घुंगरू हरवलं |
१९७१ | अशीच एक रात्र |
१९७१ | लाखात अशी देखणी |
१९७१ | सोंगाड्या |
१९७२ | पुढारी |
१९७४ | सून माझी सावित्री |
१९७४ | सुगंधी कट्टा |
१९७५ | पाच रंगाची पाच पाखरं |
१९७६ | जवळ ये लाजू नको |
१९७८ | कलावंतीण |
१९७८ | नेताजी पालकर |
१९७९ | ग्यानबाची मेख |
१९७९ | हळदी कुंकू |
१९८० | मंत्र्याची सून |
१९८० | सवत |
१९८१ | पोरी जरा जपून |
१९८१ | तमासगीर |
१९८२ | दोन बायका फजिती ऐका |
१९८२ | राखणदार |
१९८७ | बोला दाजिबा |
१९८७ | इरसाल कार्टी |
१९९० | थांब थांब जाऊ नको लांब |
१९९३ | लावण्यवती |
२००६ | मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे |
नाटके
[संपादन]- कॉलेजकुमारी (स्त्री भूमिका)
- स्टेट काँग्रेस
- बेबंदशाही
- आगऱ्याहून सुटका
- झुंझारराव
- मानापमान
- संशयकल्लोळ
- कोकणची नवरी
- ऐका हो ऐका
- जाळीमंदी पिकली करवंदं
- सोळावं वरीस धोक्याचं
- नर्तकी
- राया मी डाव जिंकला
- लावणी भुलली अभंगाला
- आता लग्नाला चला
- आल्या नाचत मेनका रंभा
पुरस्कार
[संपादन]- २०१३ सालचा विशेष दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार गणपत पाटील यांना जाहीर झाला आहे.