इंटरनेट मीम
इंटरनेटद्वारे प्रसार होणाऱ्या निरर्थक, विनोदी किंवा सांस्कृतिक अशा संकल्पनेला इंटरनेट मीम[१] म्हणतात. हा शब्द मिम्स या संकल्पनेवर आधारलेला आहे. मिम्स ही संकल्पना मात्र या शब्दापर्यंत सीमित नसून बरीच व्यापक आहे. सर्वसाधारणतः एखाद्या मिमेत व्यक्ती, कंपनी, उत्पादन इत्यादींचा त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रचार केला जातो. उदाहरणासाठी “व्हॅनिटी साईट्स” ही मीम जगातील पहिला मिमांपैकी एक आहे. इंटरनेट मिमचे स्वरूप हे छायाचित्र, लहान चलचित्र(व्हिडिओ) किंवा त्यांचे संच ( कोलाज) असे असू शकते.
माहिती
[संपादन]मुळात इंटरनेट मीम या संज्ञेचा जन्म आंतरजालामुळे झाला. ही संज्ञा हायपरलिंक, चलचित्र[२], संकेतस्थळ, हॅशटॅग, किंवा फक्त एखाद्या शब्दात आणि वाक्यात पण मोडता येऊ शकते. ही मीम एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सोशल नेटवर्क संकेतस्थळे, ब्लॉग, त्वरित ईमेल, वृत्तस्रोत, आणि इतर वेब-आधारित सेवांच्या माध्यमातून पसरविता येऊ शकते.
इंटरनेट मीम शाश्वत ठेवता येऊ शकते किंवा, समालोचन, अनुकरण, विडंबन यांमधून कालानुरूप बदलता येऊ शकते. इंटरनेट मिमेत कालानुरूप बदलण्याची आणि पसरण्याची मोठी क्षमता आहे. कधीकधी ती लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहोचू शकते, तर कधीकधी अपयशीही ठरू शकते. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. त्यांचा प्रसार ठराविक पद्धतीने न होता नैसर्गिक पद्धतीने होत असतो.
इंटरनेट मिमांच्या झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक. मिमांवर संशोधन करतात आणि कोणती मीम किती दिवस टिकणार आणि आंतरजालावर किती पसरणार ह्याचा अंदाज लावतात. आर्थिकरीत्या आजकाल ते व्हायरल विपणनाद्वारे जाहिरातींसाठी वापरले जाते. इंटरनेट समुदायदेखील आता मीम यशस्वी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल अश्या योजना आखताना दिसतात.
मीम ह्या शब्दाचे जनक रिचर्ड डार्किन्स् हे आहेत. त्यांनी मीम ह्या शब्दाला इ.स. १९७६ साली त्यांच्या “द सेल्फिश जीन” नावाच्या लोकप्रिय इंग्लिश विज्ञान नियतकालिकाद्वारे लोकांसमोर आणले.
प्रकार आणि वापर
[संपादन]जनसंपर्क, जाहिरात क्षेत्र आणि विपणन क्षेत्रांत सनद असलेले लोक इंटरनेट मिमांचा उपयोग आता व्हायरल विपणनामध्ये यशस्वीपणे करताना दिसतात. इंटरनेट मिमांचा वापर करून ते आपले उत्पादन लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करतात. इंटरनेट मीम हे प्रसार आणि जाहिरातीसाठी सर्वांत कमी खर्चाचे माध्यम आहे. इंटरनेट मिमांद्वारे आपण कमी खर्चात आपला ब्रॅंड तयार करून ग्राहकांसमोर आणू शकतो.
विपणक इंटरनेट मिमांचा वापर चित्रपट प्रदर्शनांसाठीही करतात. हे चित्रपट फक्त लोकांची आवड वाढवण्यासाठीच असतात, त्यांना टीकाकारांकडून चांगला शेरा अपेक्षित नसतो. इ.स. २००६ मध्ये “स्नेक्स ऑन द प्लेन” ह्या चित्रपटाने अश्याच रीतीने खूप लोकप्रियता मिळवली होती. राजकीय क्षेत्रातील लोकांनीदेखील इंटरनेट मिमांचा वापर स्वतःचा राजकीय प्रचार करण्यासाठी केला आहे. जनसंपर्क क्षेत्रातील लोकांनी इंटरनेट मिमांचा वापर सरळ जाहिरातींसाठी न करता आडमार्गाने लोकप्रियता मिळवण्यासाठी केला आहे. ह्यामध्ये माहिती देणारी संकेतस्थळे, ज्ञानकोश ह्यांचा वापर प्रामुख्याने होतो.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मिमांविषयी सचित्र मार्गदर्शक (इंग्लिश मजकूर)
- इंटरनेट मिम (मराठी मजकूर)