झोंबी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
झोंबी | |
लेखक | आनंद यादव |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस |
प्रथमावृत्ती | १९८७ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
पृष्ठसंख्या | ३७२ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-३९२-५ |
झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु.ल. देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहलेली असून या पुस्तकानंतरचे नांगरणी, घरभिंती , आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत. शाळेत जाऊन शिकण्यासाठीची आनंद यादव यांची धडपड आणि शाळा शिकू न देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी दिलेला मार आणि त्यांचे या काळातले इतर अनुभव आणि त्यांचे शाळा आणि शिक्षकांबद्दलचे विचार या कादंबरीत आहेत.
पूर्वप्रसिद्धी
[संपादन]झोंबी या पुस्तकातील काही भाग 'रसिक' (१९८०),(१९८१) तसेच 'बागेश्री' (१९८२) या नियतकालिकांच्या दिवाळी अंकातून पूर्वी प्रसिद्ध झालेला होता.
अनुवाद
[संपादन]या पुस्तकाचे हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषेत अनुवाद झालेले आहेत.
पुरस्कार
[संपादन]झोंबी या पुस्तकाला खालील पुरस्कार मिळालेले आहेत.
- भारत सरकार - साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
- महाराष्ट्र राज्य शासन - उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९८८-१८८९)
- प्रियदर्शिनी अकादमी - सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९८८)
- दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स - उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९८९)