माझी जन्मठेप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माझी जन्मठेप
लेखक विनायक दामोदर सावरकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) माझी जन्मठेप
भाषा मराठी
देश भारत भारतीय
साहित्य प्रकार आत्मचरित्र
विषय अंदमान मधील जन्मेठेपेच्या आठवणी

माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथले त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. त्याची रोमांचकारी कथा 'माझी जन्मठेप' या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे. त्यांना २४ डिसेंबर १९१० रोजी काळ्यापाण्याची शिक्षा (२५ वर्षे) पहिल्यांदा सुनावण्यात आली, तर ३० जानेवारी १९११ रोजी दुसरी काळ्यापाण्याची शिक्षा (२५ वर्षे) देण्यात आली.