वनस्पतीशास्त्रीय नावांचा उगम आणि अर्थ
Appearance
वनस्पती शास्त्रातील वनस्पतींची नावे बहुधा लॅटिन आणि ग्रीक या भाषांतील शब्दांवरून ठेवलेली असतात. काही शब्द इतर देशांतील भाषांतूनही घेतलेले असतात. अनेक नावे ही वनस्पतीशास्त्रज्ञांच्या नावावरून पडलेली आहेत. त्या नावांचे अर्थ माहीत असले तर ती नावे लक्षात राहण्यास मदत होते. किंवा नाव ऐकले की वनस्पती कशा प्रकारची आहे याचा कधीकधी अंदाज करता येतो. वनस्पतीशास्त्रीय नावांची खालील यादी(वाढवण्यास इतर सदस्यांनी मदत करावी.) :
- Adansonia : मायकेल अॅडसन Michel Adason(१७२७-१८०६) नावाच्या फ़्रेन्च वनस्पतीशास्त्रज्ञावरून
- digitata : फुलाची बोटांसारखी रचना असलेले(डिजिट म्हणजे हाताचे किंवा पायाचे बोट)
- गोरखचिंच : ज्या झाडाखाली बसून गोर(क्ष)खनाथ शिष्यांना शिकवत ते झाड
- indica=indicus : मुळात भारतीय असलेले
- Thespesia : दैवी (ग्रीक भाषेतील Thespesios या शब्दावरून)
- Azadirachta : फार्सी भाषेतल्या आज़ाद-दरख़्त या शब्दावरून
- Terminalia : पाने कोंबाच्या टोकाशी असणारे
- tomentosa : गालिचावरील सुतांप्रमाणे तलम केस असलेले
- erecta : अगदी सरळ उभे असणारे
- suberecta : बऱ्यापैकी सरळ उभे असणारे
- lamarckii : एकोणिसाव्या शतकातील निसर्गप्रेमी फ़्रेन्च लेखक Jean Baptiste de Monet Lamarck यांच्या नावावरून
- Alengium : भारतात केरळामध्ये आढळणाऱ्या अलंगी नावाच्या झाडाप्रमाणे असलेले
- Calystegia : देठाचे पिळे घालतघालत वरवर चढणारी वेल
- Butea : वनस्पतीशास्त्रातले दर्दी John Stuart, Earl of Bute यांच्या नावावरून
- frondesa : भरपूर पाने असलेले
- Lagerstroemia : अठराव्या शतकातील स्वीडिश व्यापारी आणि वनस्पतीतज्ज्ञ Magnus V. Lagerstroem यांच्या नावावरून