सुधा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधा नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. पुण्याजवळच नाशिक रस्त्यावर भंडाऱ्याचा डोंगर आहे. या डोंगरावर बसून तुकाराम महाराज देवाचे चिंतन करीत असत. डोंगराच्या पश्चिमेस जाधववाडी धरण आहे तेथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे व तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे., ही नदी जाम्बोडे - सुदवडी- सुदुम्बरे - येलवाडी मार्गे वहात वहात देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. त्यापूर्वी तिला वडगाव मावळातील नवलाख उंब्रे येथे बुधा नदी येऊन मिळते. या सुधा आणि बुधा नद्यांच्या संगमावर एक बाराव्या शतकातील राम मंदिर आहे. सुधा नदीला बाराही महिने पाणी असते.

सुधा नदीवर सुदवडी गावाच्या हद्दीत एक पूल आहे.



पहा : जिल्हावार नद्या