गुग्गुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे.

गुग्गुळाला संस्कृतमध्ये उलूखल, कुंभ, कालनिर्यास, कौशिक, गुग्गुळ, दिव्य, पलंकशा, पवनद्विष्ट, पुर, भूतहर, मरुद्विष्ट, महि़षाक्ष, यातुघ्न, रक्षौहा, शिव, इत्यादी शब्द आहेत. अन्य भाषेतील शब्द : मुक्कूल (अरबी), Indian Dellium (इंग्रजी), काष्ठगण (कानडी), गुगरु (गुजराती-सिंधी), गुक्कल/गुक्कुलु (तामिळ), गुबुल/मैषाक्षी (तेलुगू), बूएज हैदौन (फारसी), गुग्गुलु (बंगाली), Commiphora mukul (शास्त्रीय नाव), गुगल (हिंदी).

कण गुग्गुळ, कुमुद गुग्गुळ, पद्म गुग्गुळ, महानीळ गुग्गुळ आणि म्हैशा गुग्गुळ या पाच प्रकारच्या गुग्गुळांची शेती करतात.

आयुर्वेदामध्ये गुग्गुळापासून बनविलेली शेकडो रसायने आहेत. अमृतादी गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, कुक्कुटनखी गुग्गुळ, गुग्गुळ कल्प, गोक्षुरादी गुग्गुळ, त्यागराज गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, मेदोहर गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, इत्यादी. वैद्याच्या सल्ल्याशिवाय गुग्गुळाचे औषध घेणे धोक्याचे असते.

औषधी उपयोग[संपादन]

ही वनस्पती वजन कमी करण्यासाठी वापरली जाते. "स नवो ब़्रहण, पुराण लेखनः।" म्हणजे नवीन गुग्गुळ बलकर असतो आणि जुना 'लेखन' करतो.तसेच याचा उपयोग औषधादिक्रनात संधानीय द्रव्य म्हणूनवापर करतात