महाराष्ट्र शासकीय अधिकारी
Appearance
मोटारीवरील दिव्याचे अधिकार
[संपादन]- लाल दिवा (फ्लॅशरसह)
- राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विभागांचे मंत्री, विधानमंडळाचे विरोधी पक्ष नेते व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मोटारींना...
- लाल दिवा (फ्लॅशरविना)
- विधानसभा उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त.यांच्या मोटारींना.
- अंबर दिवा (फ्लॅशरविना)
- अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक व त्या पदावरील समकक्ष अधिकारी आणि आपल्याच कार्यक्षेत्रात वावरणारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, 'अ' व 'ब' वर्ग महानगरपालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक व विभागीय आयुक्त..
- अंबर दिवा (फ्लॅशरसह)
- शासकीय, निमशासकीय सेवेतील वाहने.
- निळा दिवा
- कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना, पोलिसांच्या वाहनांना.
- जांभळ्या काचेतील लुकलुकणारा लाल दिवा
- रुग्णवाहिकेसाठी.
- लाल, निळा व पांढरा असा बहुविध रंगाचा दिवा
- आपत्कालीन व्यवस्थेतील व आणीबाणी व्यवस्थापनासाठीच्या वाहनांना.