Jump to content

झरथुष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:An Image from Zarathustra.jpg

संत झरथुष्ट्र (इंग्लिश: Zarathustra) हा झोराष्ट्रीयन धर्माचा पहिला देवदूत आहे. झरथुष्ट्र हा अवेस्तान भाषेतील शब्द आहे. याचे दोन अर्थ होतात: १. बुद्धिमान उंटाचा मालक, २. सुवर्ण तारा. झरथुष्ट्राचे पूर्ण नाव झरथुष्ट्र स्पितमा असे होते. स्पितमा हे त्याच्या घराण्याचे नाव होते, ज्याचा अर्थ "सर्वाधिक श्वेत, पवित्र." असा होतो.[] झरथुष्ट्राच्या नावापुढील अशो या शब्दाचा अर्थ "परमेश्वराच्या दैवी योजनेची माहिती असलेला" असा आहे.

कयानियन राजवटीमधे वाढत चाललेल्या सैतानी शक्तीला आळा बसावा म्हणून आहूरा माझदा ने झरथुष्ट्र स्पितमाला आपला दूत म्हणून पाठवले. झरथुष्ट्राचा जन्म रोज खोरदाद, माह फरवरदिनला झाला. या दिवसाला खोरदाद साल म्हणून ओळखतात. झरथुष्ट्र हा जन्माला येताना हसत हसत आला होता.

पुढे कयानियन राजा विश्तस्प, त्याचा भाऊ जहीर, राणी कताबुन, राजकन्या अस्पंद्यर व पेशोतन, मंत्री फरशाओस्त्र व जमास्प व इतर इराणी लोकांनादेखील झरथुष्ट्र हा देवदूत असल्याची खात्री पटली. या दिवसाला दिन बेह मिनो महेरस्पंद म्हणून ओळखले जाते व हा दिवस जशन करून साजरा केला जातो.

संत झरथुष्ट्राचे निर्वाण त्याच्या जन्मानंतर ७७ वर्षे व ११ दिवसांनंतर झाले. त्या दिवसास झरथुष्ट्रनो दिसो असे म्हणतात. माह दाए या पारसी महिन्यातील, रोज खोरशेद हा तो दिवस आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ झरथुष्ट्र [१] (इंग्लिश मजकूर)