व्हिला मेदिची दि करेज्जी
building in Careggi, Italy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | villa, संग्रहालय | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Medici Villas and Gardens in Tuscany | ||
स्थान | फ्लोरेन्स, Metropolitan City of Florence, तोस्काना, इटली | ||
Street address |
| ||
स्थापत्यशास्त्रातील शैली |
| ||
वास्तुविशारद |
| ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
क्षेत्र |
| ||
| |||
व्हिला मेदिची दि करेज्जी हा इटलीच्या तोस्काना प्रांतातील फिरेंझे शहराजवळील एक महाल आहे. याच्या आसपासच्या भागाला करेज्जी असे नाव आहे. हा भाग फिरेंझेचे उपनगर समजले जाते.
इतिहास
[संपादन]मेदिची घराण्याने बांधलेल्या अनेक महालांपैकी हा पहिला होता. कोसिमो दे मेदिचीने येथे प्लॅटॉनिक अकादमी स्थापन केली होती. हा १४६४मध्ये येथेच मृत्यू पावला. फिरेंझेमधील महालांप्रमाणे या महाला भोवती शेत होते ज्याकरवी येथे राहणारी कुटुंबे स्वयंपूर्ण होती. कोसिमोच्या वास्तुविशारद मिशेलोझ्झोने या महालाची पुनर्रचना करून त्याला तटबंदी घातली. येथील प्रसिद्ध बाग मध्ययुगीन बागांच्या धर्तीवर रचलेली आहे आणि महालाच्या वरील मजल्यांवरून ही दिसते.
ही जागा १४१७ मध्ये लॉरेंझो या कोसिमोच्या भावाने खरेदी केली होती. [१] कोसिमो इल व्हेक्कियो (म्हातारा कोसिमो) त्याच्या मध्यवर्ती अंगणाच्या भोवती हा महाल पुन्हा बांधून काढला. त्याच्या नातू असलेल्या लॉरेंझो इल मॅग्निफिकोने येथील बाग आणि बॉशींचा विस्तार केला.
लॉरेन्झो दे मेदिची १४९२ मध्ये येथेच मृत्यू पावला.[२] त्यानंतर १६१५ पर्यंत ही वास्तू दुर्लक्षित राहिली. १६१५मध्ये कार्डिनल कार्लो दे मेदिची आतील भागाची पुनर्रचना करण्यासाठी आणि बाग अद्ययावत करण्यासाठीच व्यापक प्रकल्प हाती घेतले.
१७७९मध्ये हा महाल मेडिची घराण्याच्या वारसांकडून विन्सेंझो ओर्सी यांनी खरेदी केला; ओर्सीच्या वारसांनी तो १८४८ मध्ये फ्रान्सिस स्लोन या इंग्रज माणसाला विकला: स्लोनने येथील बागेत अनेक दुर्मिळ झाडे-झुडुपे लावली. यांत लेबेनॉनचे देवदार आणि हिमालयी देवदार, कॅलिफोर्नियाचे सिकोइया, पूर्व भूमध्य समुद्रातील आर्बुट आणि ताड, इ.चा समावेश आहे.
आता या महालाची मालकी तोस्कानाच्या प्रशासनाकडे आहे [३]
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस या महालाचे पुनर्नवीकरण करण्यात आले. [४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Hibbert, Christopher (6 December 2001). The Rise and Fall of the House of Medici. Penguin UK. p. 371. ISBN 9780141927145.
- ^ Fryde, E. B (1 July 1984). "Humanism and Renaissance Historiography". A&C Black. p. 122. ISBN 9780826427502.
- ^ "Ville e Giardini Medicei - Villa di Careggi". Regione.Toscana.it. 2017-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Medici Villas and Gardens". Unesco World Heritage Site. 1997. 24 October 2018 रोजी पाहिले.