Jump to content

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्‍नागिरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्‍नागिरी एज्युकेशन सोसायटीचे र.प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र.वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय हे रत्‍नागिरी शहरातील अग्रगण्य असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९४५ साली झाली. या महाविद्यालयास बहुमोल शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सहभाग घेऊन एकूण दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

कला विभाग

[संपादन]
  • भाषाविभाग-

महाविद्यालयामध्ये पाच विविध भाषांचे अध्यापन केले जाते. या पाच विभागांमध्ये इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत उर्दु या भाषांचा समावेश होतो. या पाच भाषांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात सुसज्ज संगणक कक्ष उपलब्ध आहे. याच्या मदतीने एखाद्या विषयासंदर्भात दृकश्राव्य माहिती विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मिळविता येते.

  • इंग्रजी भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.अतुल पित्रे

  • मराठी भाषा विभाग :

विभागप्रमुख-प्रा.शिवराज गोपाळे

  • हिंदी भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.चित्रा गोस्वामी

  • संस्कृत भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.कल्पना आठल्ये

  • उर्दु भाषा विभाग :

विभागप्रमुख-प्रा.दानिश गनी

शास्त्र विभाग

[संपादन]

महाविद्यालयाला विस्तृत असा शास्त्र विभाग आहे. या शाखेंतर्गत अनेक उपशाखांचे सम्मिलीकरण केले आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित तसेच व्यावसाईक अभ्यास्क्रमातर्गत संगणक विद्यान, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र यांचा समावेश केला गेला आहे.

क्रीडा विभाग/जिमखाना विभाग

[संपादन]

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असा क्रीडा विभाग आहे.