रीजंट्स पार्क
Appearance
रीजंट्स पार्क तथा द रीजंट्स पार्क ) हे इंग्लंडची राजधानी लंडनमधील शाही बगीच्यांपैकी एक आहे. १७० हेक्टर (४१० एकर) विस्ताराचा हा बगीचा लंडनच्या मध्यवर्ती भागाजवळ वेस्टमिन्स्टर शहर आणि कॅमडेन बरो मध्ये आहे. येथे विस्तीर्ण बाग आणि तलाव आहे तसेच बागेच्या एका टोकाला रीजंट युनिव्हर्सिटी आणि लंडन प्राणीसंग्रहालय आहेत.
इ.स. १५०० च्या सुमारास या परिसरातील ख्रिश्चन मठ हलल्यानंतर इंग्लंडच्या राजाने या जागेचा ताबा घेतला. त्याचा वापर शिकार आणि कुळवाडी शेतीसाठी केला जात असे. १८१० च्या दशकात, प्रिन्स रीजेंटने बागेत बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. राजाने यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यावर जेम्स बर्टन याने आपल्या पैशाने हा बगीचा बांधला. याची रचना जॉन नॅश, जेम्स बर्टन आणि डेसिमस बर्टन यांनी केली. त्यांनी बगीच्याबरोबरच त्याला लगत घरे आणि महागडे बंगलेही बांधले.