धूळपाटी/अंधाराच्या पारंब्या
Appearance
१९२० इ.स.चा महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज, या समाजातील रूढी व त्यांना चिकटून राहू इच्छिणारा परंपरावादी वर्ग आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्काने प्रभावित झालेला सुधारणावादी वर्ग ह्यांच्यातील संघर्ष ह्या कादंबरीत आहे. खेड्यातून आलेली एक अशिक्षित पोर बॅरिस्टरांच्या सहवासात कशी उमलत जाते, त्या दोघांमधले सौंदर्य्लोलुप स्नेहाचे नाते कसे हळुवारपणे उमलत जाते,तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे कसे घडत जाते आणि क्रूर सामाजिक रूढी आणि नियतीचा खेळ यापुढे हे उमलते व्यक्तिमत्व कसे कुस्करलेजाते, ह्याचे ह्रुद्य चित्रण येथे आहे.’अंधाराच्या पारंब्या’ या कादंबरीवर आधारित ’बॅरिस्टर’ हे नाटकही अमाप लोकप्रिय ठरले.