Jump to content

छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४७ साली शिक्षणाचा प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत व्हावा या उद्देशाने १९४७ साली कॅंप भागात ह्या महाविद्यालयाची स्थापना केली. भाऊराव पाटलांना विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करायची होती मात्र मागणीनुसार त्यांनी कला महाविद्यालय स्थापन केले. पण लवकरच त्यांनी विज्ञान व वाणिज्य विभागाची अनुक्रमे १९५८ व १९५९ साली स्थापना केली. नंतर या विभागांची १९६५ व १९७१ साली यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्थाधनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय अशी स्वतंत्र महाविद्यालये सुरू केली.

रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले महाविद्यालय असून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. बहुजन समाजाचा उद्धार व्हावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून तळागाळातील समाजाला उच्च शिक्षण मिळावे या उद्दात्त हेतूने हे महाविद्यालय अण्णांनी स्थापना केली. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडून विविध अधिकार पदावर कार्यरत आहेत.

या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असून या केंद्रामधून सुमारे ६००हून अधिक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत.