Jump to content

अनुराधा कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अनुराधा गोविंद कुलकर्णी या मराठी इतिहास अभ्यासक आहेत. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या त्या सदस्य असून संस्थेच्या माध्यमातून इतिहास विषयक अभ्यास व संशोधन करतात.

डॉ. अनुराधा कुलकर्णी
जन्म नाव अनुराधा गोविंद कुलकर्णी
शिक्षण एम.ए., एम.फील., पीएच.डी.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
विषय शिवकाळ, ऐतिहासिक कागदपत्रे
प्रसिद्ध साहित्यकृती शिवछत्रपतींची पत्रे

मराठा कालखंडातील विशेषतः शिवछत्रपतींची कालखंडातील ऐतिहासिक कागदपत्रे व त्याअनुषंगाने समोर येणारा इतिहास प्रसिद्ध करण्याचे कार्य सतत ३० वर्षे करत आहेत. विविध ग्रंथस्वरुपात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्राचे लिप्यांतर व‌ संपादन करून प्रसिद्ध केले आहेत. यासह भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. विविध वर्तमानपत्रात त्यांचे लेखमाला व इतर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

शिक्षण

[संपादन]

अनुराधा कुलकर्णी यांनी १९९४ साली डॉ.रेखा रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विषयातील एम.फील. ची पदवी 'पेशवेकालीन पुणे : सामाजिक अभ्यास' हा लघुप्रबंध सादर करून मिळवली. 'ज्ञानप्रकाश वृत्तपत्राची कामगिरी इ.स. १८४९ ते १९०४' या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली.

ग्रंथ संपदा

[संपादन]
  1. लेखनप्रशस्ती
  2. ज्ञानप्रकाश १८४९ ते १९५० - महाराष्ट्राच्या जडण-घडणीचा साक्षीदार , सकाळ प्रकाशन, पुणे
  3. शिवछत्रपतींची पत्रे खंड १ , परममित्र पब्लिकेशन्स
  4. शिवछत्रपतींची पत्रे खंड २ , परममित्र पब्लिकेशन्स
  5. शिवचरित्र साहित्य खंड १५ (सहसंपादक - अजित पटवर्धन) , डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
  6. शिवचरित्र साहित्य खंड १६ (सहसंपादक - अजित पटवर्धन) , भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
  7. श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे (सहसंपादक - अजित पटवर्धन)
  8. महजर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज इ.स.१५०० ते १८०० , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२२
  9. महजर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार इ.स १४०० ते १८००, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२*
  10. श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे , श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळे
  11. अप्रकाशित महजर इ.स.१५५६ ते १७९० , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२*
  12. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १८ मराठी कागदपत्रांचे नमुने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०२४
  13. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १९, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०२४

संदर्भ

[संपादन]