उरी: द सर्जिकल स्ट्राईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उरी: द सर्जिकल स्ट्राईक २०१९मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट आदित्य धर याने दिग्दर्शित केला तर रॉनी स्क्रूवालाने आरएसव्हीपी मूव्हीझच्या नावाखाली निर्माण केला.

या चित्रपटात २०१६मध्ये उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून केलेल्या प्रतिहल्ल्याची कथा आहे. सत्यघटनेवरील आधारित असलेल्या या कथानकात काही काल्पनिक भाग आहेत. यात विकी कौशल, यामी गौतम, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी आणि परेश रावळ यांनी अभिनय केला आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये २५ कोटी रुपयांचा खर्च झाला आणि जगभरात त्याने ३ अब्ज ६० कोटी रुपयांची कमाई केली.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "'URI - THE SURGICAL STRIKE". Box Office India. 5 March 2019. 20 February 2022 रोजी पाहिले.