एम इंडिकेटर
Appearance
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे वेळापत्रक म्हणजे मुंबई इंडिकेटर. हा मोबाईलवर सर्रास वापरला जाणारा एक ॲप आहे. त्याद्वारे एखाद्याला मुंबईतील ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट इत्यादींचे मार्ग, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा आणि त्या वाहतुकीसाठी किती पैसे त्या सेवा नागरिकांकडून आकारतात इ. सर्व माहिती कळू शकते. त्यासाठी वापरायचा मोबाईल हा अँड्राॅइड किंवा आय ओस प्रणाली धारण केलेला असावा. अँड्राॅइड किंवा आय ओएस प्रणाली नसेल तरीसुद्धा काही मोबाईल मध्ये हा ॲप सुरू होऊ शकतो. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्ले स्टोर (अँड्राॅइड) किंवा ॲप स्टोर (आय ओएस-iPhone Operating System)मधे जाऊन मुंबई इंडिकेटर डाऊनलोड करता येतो. तिथे एम् - इंडिकेटर (M-Indicator) हा पर्याय दिसतो.. हा ॲप निशु:ल्क आहे, त्यासाठी वापरकर्त्याकडून कुठलेही पैसे आकारले जात नाहीत.