Jump to content

निअँडरथाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. १९०८ साली फ्रान्समध्ये शोधली गेलेली निॲन्दरथल मानवाची कवटी

निॲन्दरथल मानव हा प्रगत मानवाचा पूर्वज आहे.[][] या वंशाच्या जवळजवळ चारशे मानवाचे अवशेष आतापर्यंत शोधले गेलेले आहेत.[] याचे अस्तित्त्व इ.स.पू. ४०००० ते इ.स.पू. २०००० वर्षे या कालखंडात होते.

निॲन्दरथल मानवाचे कपाळ सरळ उभे नसून तिरपे, भुवयाची हाडे वाढलेली, खालचा जबडा भक्कम परंतु हनुवटी न दाखविणारा आणि डोक्याची कवटी किंचित मागे वाढलेली होती. याचा मेंदू सध्याच्या मानवापेक्षा मोठा होता.[] निॲन्दरथल मानव हुषार होता व दगडी हत्यारे उत्तम बनवीत होता.[] फ्रान्समधील ल मुस्तिए या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निॲन्दरथल मानवाने बनविलेली दगडी हत्यारे सापडली असून त्यावरून हा मानव गोफणीचे दगड, तासण्या व दगडी चाकूची पाती वापरीत होता असे दिसून आले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ कोलिन पी.टी. बेलिए. "Neandertals: Unique from Humans, or Uniquely Human?" (PDF) (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  2. ^ "Ancient DNA and Neanderthals" (इंग्रजी भाषेत). 2017-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  3. ^ "New Evidence On The Role Of Climate In Neanderthal Extinction" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  4. ^ डेविड ब्राऊन. "Neanderthal Brain Size at Birth Sheds Light on Human Evolution" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  5. ^ केटिआ मॉस्कविच. "Neanderthals were able to 'develop their own tools'" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  6. ^ हेविलॅन्ड, विलियम ए.; हेराल्ड ई.एल., प्रिन्स; डॅना, वॉलरथ. (इंग्रजी भाषेत) http://books.google.com/books?id=AmvJ1XtnIQoC&pg=PA87. ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत पुस्तकtitle= ignored (सहाय्य); Unknown parameter |पुस्तकtitle= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]