चर्चा:अंजली सोमण
"विश्वसनीय स्रोत" कसे मिळवायचे
[संपादन]नमस्कार,
अंजली सोमण यांचे विकि एंट्री मी तयार करत आहे. त्यांच्या पानाला "विश्वसनीय स्रोत" कसे जोडायचे याची मला मदत हवी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची पुस्तके नामांकित प्रकाशकांद्वारे प्रसिद्ध झाली आहेत. परंतु, "बाह्य दुवे" काय प्रकारचे लागतात हे मला लक्षात येत नाहिये. जर कोणाला मदत करता आली तर कृपया मला कळवा. धन्यवाद. 98.122.153.179 ००:५१, २१ जून २०२२ (IST)
नमस्कार, कृपया जमल्यास विकिपीडियावर सनोंद (म्हणजे लॉगीन करून) संपादने करावीत, जेणेकरून एकमेकांशी संवाद करणे सोपे जाईल.
कृपया बाह्य दुवे सध्या बाजुला ठेवा. त्या ऐवजी लिखाणातील प्रत्येक माहितीला संदर्भ जोडा. जसे की मराठी कथेची स्थितिगती” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले या विधानाच्या पुष्टीकरिता एखाद्या संकेतस्थळावर, जिथे ही माहिती आहे त्याची लिंक जोडावी. याप्रकारे आपल्याला अनेक दुवे जोडणे आवश्यक आहे. आता विश्वसनीय स्रोत म्हणजे काय, तर थोडक्यात लोकमत, सकाळ, झी न्यूज वगैरे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी बातमीचा दुवा होय. फेसबुक, ट्विटर, वैयक्तिक अनुदिनी (म्हणजे ब्लॉग) इत्यादी सोशल मीडिया व तत्सम ठिकाणची माहिती विश्वसनीय मानली जात नाही.
अंजली सोमण यांचे प्रकाशित पुस्तकांची 'प्रकाशनस्थळाची' लिंक त्या त्या पुस्तकाचे नाव आलेल्या ओळीच्या शेवटी जोडणे. उदाहरण म्हणून मी एक दोन संदर्भ या लेखात जोडण्याचा प्रयत्न करतो.
तूर्तास इतके करावे. छोट्या मोठ्या चुका झाल्या तरी हरकत नाही, आपण त्या दुरुस्त करूत. पुढील लेखनास शुभेच्छा. संतोष गोरे ( 💬 ) १२:४७, २१ जून २०२२ (IST)
- धन्यवाद! मी १३-१४ संदर्भ ॲड केले आहेत. 98.122.153.179 ०८:५०, २२ जून २०२२ (IST)
- नमस्कार, या लेखात आपण फक्त पुस्तकांना संदर्भ जोडलेत; इतर मुद्द्यांना नाही. यामुळे हा लेख एक संचिका (म्हणजे कॅटलॉग) वाटतोय. कृपया लेखात इतरत्र योग्य ते संदर्भ जोडावेत. संतोष गोरे ( 💬 ) १५:४२, २४ जून २०२२ (IST)