माचणूरचा किल्ला
Appearance
माचणूरचा किल्ला महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावाजवळील किल्ला आहे.
सन 1695 ते 1699 या या काळात मुघल बादशहा औरंगजेब याचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी याठिकाणी होते. बादशहाची ब्रह्मपुरीची छावणी मोगल साम्राज्याची राजधानी होती. मुघल साम्राज्याचे प्रशासन त्यावेळी औरंगजेबाने बांधलेल्या या किल्ल्यातून होत असे. येथील किल्ल्याला मातीची तटबंदी आणि दोन विहिरी बांधण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली होती.
बादशहा औरंगजेबाबरोबर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक ,तीन शाहजादे ,त्यांची मुले मुलगी जिनतुन्निसा बेगम या किल्ल्यामध्ये राहत होते.
<ref> सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, मराठा कालखंड ,गोपाळ देशमुख ,रेवू प्रकाशन ,पंढरपूर,2009 <ref>