Jump to content

मराठवाडी म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठवाडी म्हैस (इंग्रजी:Marathvadi Buffalo) हा एक पाण म्हशीचा प्रकार असून ही म्हैस मुख्यतः नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात आढळून येते. मराठवाडी म्हैस ही प्रकृतीने अतिशय काटक आणि मध्यम बांध्याची असते. तसेच ही सामान्य चाऱ्यावर दिवसाकाठी ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देते. म्हशीची ही जात सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. म्हशीच्या या प्रकाराला 'एलिचपुरी' आणि 'दुधणाथडी' या नावाने देखील ओळखले जाते. मराठवाड्यातील उष्ण आणि कोरड्या वातावरणास म्हशीचा हा प्रकार जुळवून घेऊन दुधाचे चांगले उत्पादन देते. यामुळे या म्हशीला मराठवाड्याचे काळे सोने असे म्हणतात. दुग्धोत्पादनातील स्पर्धेत मराठवाडी म्हैस दुर्लक्षित झाली आहे असे मानले जाते.[][]

मराठवाडी म्हशींना सहसा ज्वारीचा कडबा, भाताचा पेंढा, उसाची पाने आणि शेतातील गवत दिले जाते. दुग्धोत्पादनाचे सरासरी दूध उत्पादन १११८ किलो आणि दुधाचे फॅट सरासरी ८.८% पर्यंत असून साधारणतः ६.२५ ते १०.५ % पर्यंत कमीजास्त असते[]

शारीरिक वैशिष्ट्ये []

[संपादन]
  • या म्हशींचा रंग भुरकट ते गडद काळा असतो.
  • या प्रकारच्या म्हशींच्या कपाळावर बऱ्याच वेळा पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका किंवा एक छटा आढळून येते.
  • या म्हशींचे कपाळ रुंद असून लांब मान आणि साधारणतः लालसर डोळे असतात.
  • या म्हशीचे कान मध्यम लांबीचे असून थोडेसे खाली झुकलेले असतात.
  • या म्हशीची शिंगे मध्यम लांबीचे असून, पाठीमागे खांद्यापर्यंत एकसमान गेलेले आढळतात.
  • शेपूट मध्यम लांबीची असून, शेपटीचा गोंडा पांढरा असतो.
  • खुरांचा रंग काळा असून खुरे बांधणीला घट्ट असतात.
  • या म्हशीचे एका वेतातील दुग्धोत्पादन साधारणतः १२०० ते १२५० किलोपर्यंत असते.
  • या म्हशीचे प्रथम वितीचे वय हे ५२ महिन्याचे असून दोन वेतातील अंतर साधारणतः ५३० दिवसांचे असते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "का म्हणतात या म्हशीला मराठवाड्याचं काळं सोनं ?". १३ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "मराठवाडी म्हैस" (PDF). ५ मे २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Marathwadi" (इंग्रजी भाषेत). ५ मे २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवा

[संपादन]