सहकारी संस्थेची नोंदणी
Appearance
सहकारी संस्थेची नोंदणी.
महाराष्ट्रातील सहकाररी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते. संपूर्ण राज्यासाठी एक रजिस्ट्रार असतो आणि तोच कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या मदतीला विभागीय स्तरावर खायक रजिस्ट्रार आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रजिस्ट्रार असतात. तालुका पातळीवर जिल्हा रजिस्ट्रारच्या वतीने कार्य करण्यासाठी सहायक रजिस्ट्रार असतात. जिल्हा रजिस्ट्रार आणि तालुका पातळीवरील रजिस्ट्रार सहकारी संथांच्या नोंदणी कार्य करतात.
* अटी: [१] सहकारी कायद्याने सभासद होण्यास पात्र असणाऱ्या आणि संस्थेच्या कार्य क्षेत्रात असणाऱ्या किमान १० वैक्ती पाहिजेत. त्या एका कुटुंबातील असू नयेत. [२] संघीय स्वरूपाच्या संस्थेच्या बाबतीत किमान ५ संस्था सभासद पाहिजेत. [३] उपसा सिंचन संस्थेच्या बाबतीत किमान ५ वैक्ती पाहिजेत. [४] अमर्यादित जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्या बाबतीत सर्व सभासद एकाच खेड्यातील, शहरतील अथवा गावातील रहिवासी पाहिजेत.