अनिता बोस फाफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिता बोस फाफ
जन्म अनिता शेंकल
२९ नोव्हेंबर, १९४२ (1942-11-29) (वय: ८१)
व्हियेना, ऑस्ट्रिया
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन
नागरिकत्व ऑस्ट्रियन
पेशा राजकारणी
जोडीदार मार्टिन फाफ
अपत्ये
वडील सुभाषचंद्र बोस
आई एमिली शेंकल

अनिता बोस फाफ (इंग्रजी:Anita Bose Pfaff) (जन्म:२९ नोव्हेंबर, १९४२) ह्या एक ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच त्या ऑग्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक तसेच जर्मनीच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीमधील राजकारणी देखील आहेत.[१] फाफ या भारतीय राष्ट्रीय नेते स्व. सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी, स्व. एमिली शेंकल यांची मुलगी आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो या बॉलिवूड चित्रपटात फाफ यांचा उल्लेख आहे.[२]

प्रारंभिक जीवन[संपादन]

फाफ यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी एमिली शेंकल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पोटी व्हियेना, ऑस्ट्रिया येथे झाला. सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश सरकार विरुद्ध युद्ध करण्यासाठी जेव्हा आशियात परतले तेव्हा फाफ या केवळ चार महिन्यांच्या होत्या. फाफ चे संगोपन त्यांच्या आईने आणि आजीने केले. फाफ च्या नावामागे त्यांच्या वडिलांचे बोस हे आडनाव दिले गेले नाही. त्यांचे संगोपन अनिता शेंकल नावाने झाले.[३] इ.स. २०१२ पर्यंत, फाफ ने ऑग्सबर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.[१]


फाफ चे प्रोफेसर मार्टिन फाफ सोबत लग्न झाले होते. मार्टिन हे पूर्वी सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचे चे प्रतिनिधित्व करणारे जर्मन संसदेचे सदस्य होते. त्यांना तीन मुले आहेत: पीटर अरुण, थॉमस कृष्णा आणि माया कॅरिना.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "'To have an iconic dad is, of course, difficult' says Anita Bose Pfaff, Netaji Subhash Chandra Bose's daughter".
  2. ^ "Netaji Subhas Chandra Bose: The Forgotten Hero" – www.imdb.com द्वारे.
  3. ^ Madhuri Bose (12 November 2015). The Bose Brothers and Indian Independence: An Insider's Account. SAGE Publications. ISBN 978-93-5150-396-5.
  4. ^ "Netaji's daughter speaks!". www.rediff.com.

बाह्य दुवे[संपादन]

  1. Subhash Chandra Bose Wife Story
  2. Anita Bose-Daughter of SC Bose speaks