गोवा क्रांती दिन
१८ जून हा दरवर्षी गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. इ.स. १९४६ मध्ये या दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांना पोर्तुगीजांच्या विरोधात बोलण्याची प्रेरणा दिली. १८ जून हा दिवस गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. १८ जून १९४६ रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित होऊन लढा देण्याचा संदेश दिला. यादिवशी झालेल्या क्रांतीच्या जोरदार वक्तृत्वाने स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले आणि पुढे केले.[१] पोर्तुगीजांच्या विरोधात येथे मोठे जनमत होते. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. गोवा मुक्तीसाठी दीर्घकाळ चाललेली चळवळ. अखेरीस, १९ डिसेंबर १९६१ रोजी, भारतीय सैन्याने गोव्यावर आक्रमण केले, हा भाग पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त केला आणि गोवा भारताला जोडला. त्यामुळे दरवर्षी गोव्यातील लोकं १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतात.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Goa celebrated Revolution Day on 18 June 2013". Jagranjosh.com. १९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "जब भारतीय सेना ने गोवा को 450 साल पुराने पुर्तगाली शासन से कराया था आजाद" (Hindi भाषेत). jagran.com. 19 December 2018.CS1 maint: unrecognized language (link)