सेसिलिया एस.एल. झुंग
सेसिलिया सिउ लिंग झुंग | |
---|---|
जन्म |
१९०३ |
पेशा | वकील, लेखक |
सेसिलिया सिउ लिंग झुंग (程修龄) हीला हिस्यू-लिंग चेंग, झेंग शिउलिंग आणि सेसिलिया एसएल चेंग म्हणून देखील ओळखले जाते. तिचा जन्म १९०३ मध्ये झाला. ती जून १९७८ नंतर मरण पावली. ती एक चीनी वकील, दुभाषी आणि लेखक होती.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]झुंगचा जन्म शांघाय येथे झाला होता.[१] तिचे पालक श्रीमंत होते.[२] तिने मॅकटायर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिने १९३४ मध्ये सूचो युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमध्ये कायद्याची पदवी मिळविली.[३] तिने पुढील शिक्षण युनायटेड स्टेट्समध्ये घेतले. तिने १९३८ मध्ये बर्नार्ड कॉलेजमध्ये बॅचलर डिग्री घेतली. स.न. १९३९ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.[४] स.न. १९४२ मध्ये न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट (जे एस डी ) पदवी मिळवली. या साठी तिच्या प्रबंधाचे शीर्षक "तटस्थ जहाजे आणि विमानांवर मेलसह युद्धखोर हस्तक्षेप" असे होते.[५]
कारकीर्द
[संपादन]झुंगने नऊ वर्षे ति ज्या शाळेत शिकली होती, मॅक्टायर स्कूलमध्ये, त्याच शाळेत गणित शिकवले. ती १९३६ ते १९४६ या कालावधीत युनायटेड स्टेट्समध्ये होती, द्वितीय विश्वयुद्धादरम्यान स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेसच्या कार्यालयासह विविध खाजगी आणि सरकारी पदांवर काम करत होती. झुंग हिने टू टू मेनी (१९३९) हे विनोदी नाटक लिहिले होते.[६] तसेच पेकिंग ऑपेरा कलाकार मेई लानफांग, सिक्रेट्स ऑफ द चायनीज ड्रामा: चिनी नाटकांच्या प्रदर्शनात दिसणाऱ्या क्रिया आणि प्रतीकांसाठी एक संपूर्ण स्पष्टीकरणात्मक मार्गदर्शक (१९३७, १९६४) पुस्तक लिहिली.[७][८] स.न १९४२ मध्ये ती मिल्स कॉलेजमध्ये अतिथी लेक्चरर होती आणि कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे ए ए यु ड्ब्ल्यु सदस्यांच्या बैठकीत "चीनी महिलांची कायदेशीर स्थिती, जुनी विरुद्ध नवीन" या विषयावर भाषण दिले होते.[९] तिने १९४३ मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियातील वाय ड्ब्ल्यु सा ए गटाशी या सारखेच भाषण दिले होते.[१०]
झुंग १९४६ मध्ये शांघायला परतली आणि तेथे तिने पुन्हा कायद्याचा सराव सुरू केला. ती सूचो युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमध्येही प्राध्यापक होती.[४] १९४८ आणि १९४९ मध्ये तिने युनायटेड नेशन्स कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमनमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले.[११][१२][१३] चिनी कम्युनिस्ट क्रांतीने तिला १९४९ मध्ये शांघायला परत येण्यापासून रोखले, म्हणून ती न्यू यॉर्क शहरात स्थायिक झाली. तिने १९५० मध्ये ओहायोमधील मियामी विद्यापीठात सरकारी अभ्यासक्रम शिकवले.[१४][१५] तिने १९७० च्या दशकात युनायटेड स्टेट्समध्ये अभ्यास करणे, शिकवणे, लेखन करणे, सादर करणे आणि भाषण देणे चालू ठेवले.[२][१६]
वैयक्तिक जीवन
[संपादन]झुंगला एक तरुण स्त्री म्हणून एक महत्त्वाची मालमत्ता वारशाने मिळाली आणि स्वतःच्या या वारशाचे रक्षण करण्यासाठी ती एक वकील बनली.[१७] स.न. १९७८ च्या उन्हाळ्यात ती प्रवास करत होती आणि सक्रिय होती [१८] परंतु या काळात तिचा मृत्यु झाला.
संदर्भ
[संपादन]- ^ "UVM Has Summer Session Student Who Became Lawyer to Win her Own Case". The Burlington Free Press. 1949-08-02. p. 9. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ a b Ford, Patricia (1973-10-16). "'Old China' Woman Gains Multi Careers". The Pittsburgh Press. p. 21. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.Ford, Patricia (1973-10-16). "'Old China' Woman Gains Multi Careers". The Pittsburgh Press. p. 21. Retrieved 2021-11-18 – via Newspapers.com.
- ^ Conner, Alison W. (Spring 1994). "Training China's Early Modern Lawyers: Soochow University Law School" (PDF). Journal of Chinese Law. 8: 24.
- ^ a b Schultz, Ulrike; Shaw, Gisela; Thornton, Margaret; Auchmuty, Rosemary (2021-02-25). Gender and Careers in the Legal Academy (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. p. 235. ISBN 978-1-5099-2313-7. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Zung, Cecilia S. L (1942). Belligerent interference with mails on neutral ships and aircraft (Thesis) (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Zung, Cecilia S. L (1939). Two too many: a Chinese comedy in fifteen scenes (English भाषेत). New York: S. French. OCLC 18349458.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Zung, Cecilia S. L (2007). Secrets of the Chinese drama: a complete explanatory guide to actions and symbols as seen in the performance of Chinese dramas (English भाषेत). La Vergne, Tenn.: Lightning Source. ISBN 978-1-4067-6915-9. OCLC 820471678.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Miss Zung Tells Wigs and Cues History of Chinese Theatre". Barnard Bulletin. October 26, 1937. p. 1.
- ^ "Chinese Woman Lawyer Will Address University Women". The Sacramento Bee. 1942-02-28. p. 12. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Dr. Cecilia S. L. Zung Talks of Women in China at Friday Club". News-Pilot. 1943-01-23. p. 5. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ Adami, Rebecca (2018-10-26). Women and the Universal Declaration of Human Rights (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-0-429-79552-7.
- ^ Adami, Rebecca. "International Welfare Feminism: CSW Navigating Cold War Tensions 1949" in Rebecca Adami and Dan Plesch, eds., Women and the UN: A New History of Women's International Human Rights (Routledge 2022): 61. आयएसबीएन 978-0-367-47823-0
- ^ United Nations Department of Public Information (1948). What the United Nations is Doing for the Status of Women (इंग्रजी भाषेत). Department of Public Information, United Nations. p. 13.
- ^ "Miss Zung Was Guest Speaker". Oxford Western Roundup. April 21, 1950. p. 4. November 17, 2021 रोजी पाहिले – NewspaperArchive.com द्वारे.
- ^ "Chinese Women on Faculty". Dayton Daily News. 1950-01-09. p. 5. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Cecilia Sieu-Ling Zung to SPeak to Women's Club Here Wednesday". The Middletown Journal. 1950-02-19. p. 11. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Chinese Girls, More Subtle, Never Say 'Yes' to Lovers; Miss Zung, Young Shaighai Lawyer..." The Boston Globe. 1938-09-09. p. 6. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ Bonifanti, Terry (1978-07-19). "Keystone Elderhosteler Lives an Extraordinary Life". The Times-Tribune. p. 14. 2021-11-18 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- संदर्भ चुका असणारी पाने
- इ.स. १९०३ मधील जन्म
- चिनी महिला वकील
- बर्नार्ड कॉलेजचे माजी विद्यार्थी
- कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉचे माजी विद्यार्थी
- सूचो विद्यापीठाचे (सुझोउ) माजी विद्यार्थी
- सूचो विद्यापीठाचे (सुझोउ) विद्याशाखा
- युनायटेड नेशन्स मुत्सद्दी
- मियामी विद्यापीठातील प्राध्यापक