आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा जागतिक विशेष दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस संयुक्त राष्ट्रसंघ यांनी जागतिक अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे.[१]
इतिहास
[संपादन]२ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करावा अशी घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने २००७ साली केली. महात्मा गांधी यांनी दिलेला अहिंसेचा संदेश आणि त्याचे आचरण याचे महत्त्व अधोरेखित व्हावे असा यामागे हेतू आहे.[१]
विचारधारा
[संपादन]महात्मा गांधी यांचा भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. भगवद्गीता, हिंदू परंपरा आणि विचार, ख्रिस्ती आणि जैन धर्माचे तत्त्वज्ञान याचा त्यांचा अभ्यास होता. लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता.त्यांचा रोजचा दिनक्रम हिंदू ब्रह्मचारी वृतानुसार असे. दक्षिण आफ्रिका येथून भारत देशात परत आल्यावर गांधीजी यांनी भारतीय विचारधारा अंगिकारली. ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध सुरू झालेल्या भारतीय स्वातंत्र्यलढा क्रांतिकार्यात होणारी जीवितहानी टाळणे, मानसिक प्रक्षोभ उसळणे अशा गोष्टी टाळण्यासाठी गांधीजी यांनी अहिंसा हे तत्व स्वीकारले.[२]
स्वातंत्र्यलढयातील महत्व
[संपादन]भारतावर अधिराज्य गाजविणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय जनता लधा देत होती. ब्रिटीशांचा विरुद्ध लढा देत असताना ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय क्रांतीकारक लोकांना पकडून तुरुंगात डांबून ठेवत. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत. काही क्रांतिकारी लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःचे प्राणही दिले आहेत. काही क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजस्त्तेला शह देण्यासाठी ब्रिटिश अधिकायांची हत्या केली.हा सर्व प्रकार देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा नसल्याने देशातच नव्हे तर जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून गांधीजीनी अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला.[३]
हे ही पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b Hindi, UN News (2019-10-02). "अहिंसा दिवस पर महात्मा गाँधी के शांति संदेश की गूंज". संयुक्त राष्ट्र समाचार (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "गांधीजींची चळवळ सामान्यांपर्यत पोहचली!". Maharashtra Times. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2019-10-02). "महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्व". Lokmat. 2021-10-02 रोजी पाहिले.