Jump to content

सच्चिदानंद शेवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सच्चिदानंद शेवडे
जन्म ९ नोव्हेंबर १९६१
बडोदा, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, व्याख्याने
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, इतिहास
वडील भारताचार्य सु. ग. शेवडे
आई सौ. सुमंगला
पत्नी सौ. शुभांगी
अपत्ये पुत्र परीक्षित शेवडे, एमडी आयुर्वेद, कन्या सौ. वैदेही

डॉ. सच्चिदानंद शेवडे (जन्म १९६१ - हयात) हे मराठी लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार आहेत. त्यांनी Historical and Cultural Studies of Kashmir या विषयावर डॉक्टरेट प्राप्त केली आहे.

कारकीर्द

[संपादन]

सच्चिदानंद शेवडे यांनी इतिहास आणि क्रांतिकारक या विषयांवर भारत देशात आणि परदेशात ५००० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होतीच, याशिवाय देशातील अन्य प्रांतांतील क्रांतिकारकांचेही प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. []

साहित्य

[संपादन]
  1. अघोरवाडा - दीप प्रकाशन/पारस प्रकाशन
  2. अद्भुत शक्तीचा खजिना - (भावानुवादित, मूळ इंग्रजी 'मिरॅकल्स इन ह्यूमन' लेखक - स्वेट मार्डेन) - वरदा बुक्स
  3. ...आणि सावरकर! - नवचैतन्य प्रकाशन
  4. आत्मकथा (भारतीय यात्री ) - वरदा बुक्स
  5. इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - प्रा. डॉ. शरद हेबाळकर)
  6. सरदार उधमसिंग - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  7. कथाबोध (बालसाहित्य)
  8. कथासंस्कार (बालसाहित्य)
  9. काश्मीरनामा - नवचैतन्य प्रकाशन
  10. क्रातिकारक राजगुरू - नवचैतन्य प्रकाशन
  11. खुदीराम बोस - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  12. गुरू शिष्य (दोन भाग, माहितीपर) - व्यास क्रिएशन्स
  13. गोवा मुक्तिसंग्राम (सहलेखक - दुर्गेश परुळकर) - नवचैतन्य प्रकाशन
  14. चापेकर पर्व - अभिजित प्रकाशन पुणे
  15. श्री चिंतामणी विजय कथासार - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  16. जमात ए पुरोगामी (सहलेखक - डॉ. परीक्षित स. शेवडे)
  17. डोळे उघडा - नवचैतन्य प्रकाशन
  18. नरेंद्र ते विवेकानंद - नवचैतन्य प्रकाशन
  19. निवडक मुक्तवेध - ऋचा प्रकाशन, नागपूर
  20. पानिपतचा रणसंग्राम (सहलेखक - दुर्गेश परुळकर) - नवचैतन्य प्रकाशन
  21. पुनरुत्थान (कादंबरी) - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  22. प्रहार - अक्षय विद्या प्रकाशन
  23. बाप्पा मोरया - मोरया प्रकाशन
  24. भगतसिंग - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  25. मदनलाल धिंग्रा - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  26. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे - स्नेहल प्रकाशन
  27. माझं प्रिस्क्रिप्शन - समकालीन प्रकाशन
  28. मिशन वैष्णोदेवी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जगमोहन)
  29. रक्तलांच्छन - अस्मिता प्रकाशन, पुणे
  30. राष्ट्रजागर (वैचारिक) - गार्गी प्रकाशन
  31. वंद्य वन्दे मातरम - अभिजित प्रकाशन, पुणे
  32. वाचा आणि गप्प बसा (राजकारण) - नवचैतन्य प्रकाशन
  33. वाटा आपल्या संस्कृतीच्या (सामाजिक) - नावीन्य प्रकाशन
  34. वासुदेव बळवंत - अभिजीत प्रकाशन, पुणे
  35. वासुदेव बळवंत फडके - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  36. शिवरायांची युद्धनीती - नवचैतन्य प्रकाशन
  37. सच्चिदानंद शेवडे (आत्मचरित्र) - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  38. सत्य सांगा ना... ! (कादंबरी?) - नावीन्य प्रकाशन
  39. सावरकर ज्ञात आणि अज्ञात (सहलेखक - दुर्गेश परुळकर) - गार्गीज प्रकाशन
  40. सेक्युलर नव्हे फेक्युलर - अभिजित प्रकाशन, पुणे : या पुस्तकाला मसापचा मालिनी शिरोळे पुरस्कार मिळाला आहे (२६-५-२०१७)
  41. ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज - अभिजित प्रकाशन, पुणे

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे ‘सह्यद्रि’ हा वार्षिक पुरस्कार
  • ‘सेक्युलर नव्हे फेक्युलर’ या पुस्तकाला मसापचा मालिनी शिरोळे पुरस्कार मिळाला आहे (२६-५-२०१७)
  • पु.भा. भावे स्मृती समितीतर्फे वक्तृत्व पुरस्कार (१३-८-२०१०)

संदर्भ

[संपादन]