कंचेभागुबेव क्रिया क्रम
Appearance
कंचेभागुबेव किंवा बॉडमास क्रिया क्रम हा गणित, गणितातील आकडेवारीचा तसेच संगणक आज्ञावली (computer programming)चा एक मूलभूत नियम आहे. यात कोणतेही गणितीय किंवा सांख्यिकीय पदावली सोडवण्यासाठी बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकारादी क्रियांचा विशिष्ट क्रम सांगितलेला आहे.
'कंचेभागुबेव' किंवा 'बॉडमास' हे एक लघुरूप असून त्याचा विस्तृत अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) कं = कंस (Box)
२)चे =चाची चे. अर्थात वर्ग किंवा वर्गमूळ (Order)
३) भा = भागाकार (Division)
४) गु = गुणाकार (Multiplication)
५) बे = बेरीज (Addition)
६) व = वजाबाकी (Subtraction)
अर्थात कोणतीही गणितातील पदावली सोडवताना प्रथम कंसातील समीकरण सोडवावे. तद्नंतर वर्ग किंवा वर्गमूळ सोडवावे. तद्नंतर भागाकार-गुणाकार करावा आणि शेवटी बेरीज-वजाबाकी करावी.[१][२]
उदाहरण आणि विश्लेषण
[संपादन]- जर पदावली १+२×३+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम २×३ सोडवावे.
- 𖡺 १+२×३+४ = १+६+४
- शेवटच्या पायरीत वरील बेरीज करून अंतिम उत्तर ११ येईल.
- थोडक्यात १+२×३+४ = ११[१]
- जर पदावली (१+२)×३+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम (१+२) सोडवावे.
- 𖡺 (१+२)×३+४ = ३×३+४
- नंतर ३×३ सोडवावे
- 𖡺 (१+२)×३+४ = ९+४
- थोडक्यात, (१+२)×३+४ = १३[१]
- जर पदावली १+२+३२+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम ३२ सोडवावे.
- 𖡺 १+२+३२+४ = १+२+९+४
- = १६
- थोडक्यात, १+२+३२+४ = १६[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d Weisstein, Eric W. "Precedence". mathworld.wolfram.com (इंग्रजी भाषेत). १० मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ Stapel, Elizabeth. "The Order of Operations: PEMDAS". Purplemath (इंग्रजी भाषेत). १० मे २०२१ रोजी पाहिले.