चर्चा:संत तुकाराम
या लेखाचे नाव संंत तुकाराम असायला हवे होते.कारण केवळ तुकाराम हे कोणाही व्यक्तीचे नावही असू शकते.त्यामुळे वारकरी संंप्रदायात ही व्यक्ती ज्या नावाने ओळखली जाते तेच नाव असावे असे वाटले.आर्या जोशी (चर्चा)
संत तुकारामांच्या अभंगातील जीवनमूल्ये पानावरील मजकूर उल्लेखनीयता निकषामुळे स्थानांतरीत केला
[संपादन]संत तुकाराम हे मध्ययुगातील मराठी कवी आणि साधू पुरुष होत. संत तुकारामांचे अभंग हे मानवी जीवनाचे सार असून संत तुकारामांचा जन्म पुण्याजवळील देहू या गावी १६०८ मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत संघर्षमय जीवन जगत असताना संकटांची मालिका तुकारांच्या जीवनात आली. जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू देहूच्या परिसरात पडलेला दुष्काळ या मुळे खचून न जाता संत तुकाराम मोठ्या आत्मविश्वासाने विठ्ठल भक्तिकडे वळले आणि अभंगरचना करू लागले. त्यांचे अभंगातून मानवी जीवनमूंल्यांची शिकवण देतात.
संत तुकाराम यांचे जीवन स्वानुभव संपन्न आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेतील अंधश्रद्धा, बुवाबाजी, ढोंगीपणा, दांभिकता यावर कठोर प्रहार केला व समाजातील भोळ्याभाबल्या लोकांना जागृत केले. तुकारामांचे जीवन म्हणजे अनुभवाच्या भक्ती चा धगधगता जीवनपट आहे. जगाच्याया कल्याण संतांच्या विभूती । देह कष्टविती परोपकारे ।। सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।। असा विचार मांडताना जीवनातील दुःख याबद्दल ते सांगतात.
या अश्या अभंगातून ते जीवांमुल्यांची आविष्कार सामान्य माणसांना करतात. मनुष्य भौतिक सुखाच्या मागे आज धावतांना दिसतो, परंतु धावता धावता त्यास कोठे थांबावे हे समजले नाही असे वाटते. त्यामुळेच. या स्पर्धेमुळे त्याच्या आयुष्यातील शांतता लोप पावलेली आहे. मानसिक शांततेसाठी संत तुकारामांनी सांगितलेला जीवनमूल्ये विचार अतिशय महत्त्वाचा आहे. संत तुकाराम हे प्रतित प्रामाण्यवादी संत कवी आहेत. ते म्हणतात- अर्भकाचे साठी । पंते हाती धरली पाटी । तैसे संत जगी । क्रीया करूनी दाविती ।।
स्वतः अनुभव घेतल्यानंतरच जगाला ते सांंगण्यासाठाी ते पुढे येतात. संत तुकारामांनी आपल्या अभंग वाड्मयामध्ये जी मूल्यसंकल्पना मांडती आहे. त्यातील प्रत्येक विचार हा जणू ज्ञानाचा अमृतकुंभच आहे. ज्याद्वारा मानवी जीवनाला नैैतिक अधिष्ठान प्राप्त होउन, जीवन अधिक तेजपुंज अन् नितिमान करण्याचा तुकारामांचा अट्टाहास, सामान्य व्यक्तीला अलौकिक आनंदाची व समाधानाची अनुभूती देणारा ठरलेला आहे. आजही आपल्याला तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनुभवता येतो.