Jump to content

सदस्य:Prpawarspecial

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री ह.भ.प. अनाथाची माऊली भागवताचार्य रामेश्वरजी महाराज पवार[]

''नाव'' - रामेश्वर गणेशराव पवार

''पत्ता'' - निल्लोड फाटा ता. सिल्लोड जि. संभाजीनगर (औरंगाबाद)

''जन्म'' - 03 जून 1980

''जन्म स्थान'' - लाडसावंगी ता.जि. संभाजीनगर (औरंगाबाद)

''संस्थापक अध्यक्ष'' - 'श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा' 'संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा' 'संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज निल्लोड फाटा' ' माऊली अनाथालय व गोशाळा निल्लोड फाटा ता.सिल्लोड जि.संभाजीनगर (औरंगाबाद)


[]जीवन


श्री ह.भ.प. अनाथाची माऊली भागवताचार्य रामेश्वरजी महाराज पवार यांचा जन्म श्री गणेशराव व सौ. भिकाबाई यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. त्यांना एकून 6 भाऊ व 4 बहिणी.

त्यांना कीर्तन प्रवचनाची खूप आवड होती. ते 12 वीत असतांना अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आळंदी येथे गेले. काही दिवसांनी ते आळंदी येथील शिक्षन घेऊन परत गावी आले आणि आई-वडिलांनी त्यांचा विवाह उरकून टाकला.

[] कार्य

त्यांनी 2007 मध्ये स्वतः दोन रूम व छोट्याश्या  कुडात एक अध्यात्मिक शिक्षणच रोप लावलं. त्यांनी त्यास श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था असे नाव दिले. आज हेच रोप मोठ्या वटवृक्षाच्या रुपात निल्लोड फाटा येथे मोट्या बिल्डिंगमध्ये रूपांतरित झालं आहे.

अगोदर श्री माऊली शिक्षण संस्थेतून बरेच विध्यार्थी घडत गेले.परंतु, काही लोकांनी, समाज कंटकांनी महाराजांची संस्था बंद लढावी म्हणून त्या कुडाला आग सुद्धा लावली तेव्हा आग महाराजांनी बोर लावून कशीतरी विझवली त्यात कोणालाही हानी पोहचली नाही पण महाराजांनी धीर सोडला नाही. त्यांनी परत जोमाने काम केलं आणि मुलांना शिकवत राहिले.

' त्यांचं एक म्हणणं आहे आपल्या संस्थेतील विध्यार्थी फक्त कीर्तन, भजन, प्रवचन एवढंच नाही शिकले पाहिजे तर ते कंप्युटर, लाठीकाठी ते डॉक्टर, इंजिनिअर, ips, ias अश्या मोठं मोठ्या पदावर लागावेत त्यासोबत कोणी म्हणले की आज  अध्यात्मिक कार्यक्रम इंग्रजी करायचा तर तेही या पुढील पिढीने केले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे.'

या श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेत अनाथमुल, गोरगरीब मुलं, आत्महत्याग्रस शेतकरी यांची मूल व इतर मुले शिक्षण घेतात.

"संस्थेचे कार्य"

1) गरीब व अनाथ विद्यार्थ्यांचे संगोपन.

2) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे संगोपन.

3) गोर-गरीब मुलींच्या विवाहासाठी मदत कार्य.

4) गो-शाळा व गो-रक्षण प्रचार.

5) व्यसन मुक्तीसाठी प्रबोधन व प्रचार.

विशेष या संस्थेला सरकार कडून कोणतीही मदत मिळत नाही. महाराजांच्या कीर्तन, प्रवचन , भागवत कथा , राम कथा , संत चरित्र याच्या देणगीवर ही संस्था चालते.

  1. ^ .
  2. ^ "जीवन". https://www.facebook.com/rameshwar.pawar.393950. External link in |website= (सहाय्य)
  3. ^ कार्य