आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण संघटना
Appearance
International Hydrographic Organization | |
Organisation hydrographique internationale | |
संकेतस्थळ | IHO.int |
---|
आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण संघटना (इंग्रजी : International Hydrographic Organization, फ्रेंच : Organisation hydrographique internationale)जलमापचित्रणासाठी एक आंतरसरकारी सल्लागार आणि तांत्रिक संस्था आहे, जी १९२१ मध्ये आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण विभाग ( ब्युरो हायड्रोग्राफिक आंतरराष्ट्रीय ) म्हणून स्थापित झाले होते. ३ मे, १९६७ रोजी मोनॅको मध्ये झालेल्या करारानंतर, या संगठनेचे आत्ताचे ९९७० पासून आत्ताचे नाव स्वीकारले गेले. [१]
उद्दिष्ट
[संपादन]ही जल मापचित्रण सेवांचे समन्वय करणारी संस्था आहे जी संबंधित सरकारांनी अधिकृतपणे अधिस्वीकृत केली आहे. या संघटनेची उद्दीष्टे आहेत:
- राष्ट्रीय जलमापचित्रण कार्यालयांच्या कार्याचे समन्वय करणे.
- सर्वसाधारणपणे नाविक आणि नकाशाशास्त्र प्रकाशनांचे मानकीकरण साध्य करणे.
- जलमापचित्रणाच्या विकासासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करणे.
- जलमापचित्रणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या विकासास आणि भौतिक समुद्रशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या तंत्रांना प्रोत्साहन देणे
नकाशाशास्त्रीय वैशिष्ट्य
[संपादन]- फ्रेम्स, अंशशोधन , रेटिकल आणि आलेखी मापनश्रेणी .
संदर्भ
[संपादन]- ^ "About the IHO | IHO". iho.int. 2021-04-23 रोजी पाहिले.