Jump to content

फोंडूशास्त्री करंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र वामन तथा फोंडूशास्त्री करंडे हे एक गोमंतकीय विद्वान होते. आपल्या रामचंद्र नावात दोन र आहेत म्हणून त्यांनी द्विरेफ हे टोपणनाव धारण केले. द्विरेफ म्हणजे भुंगा असल्याने, फोंडूशास्त्रींनी वर्तमानपत्रातून गुंजारव या सदराखाली चार दशके लेखन केले. या विद्वानाबद्दल परेश प्रभू यांनी बरीच माहिती दिली आहे, ती अशी :

फोंडूशास्त्री आणि परेश प्रभू यांच्या पत्रव्यवहारात तत्कालीन सामाजिक-शैक्षणिक-राजकीय - आर्थिक परिस्थिती, आणीबाणी, पोर्तुगीज राजवटीमध्ये हिंदू समाजावर येणारी बंधने, गोवा मुक्ती लढा, त्याकाळच्या साहित्यिक चळवळी, वाङ्मयीन जडणघडण, साहित्यिकांचे आपसातील संबंध, साहित्यिकांनी घेतलेली टोपण नावे, साहित्यकृती वगैरेचे उल्लेख आले आहेत. या पत्रांमधून साहित्यकृतींचे विशेष - जसे कोणत्या छापखान्यात छापले गेले, प्रकाशक, प्रकाशनाचे साल, प्रस्तावना, प्रस्तावनांसंबंधी काही माहिती , साहित्यकृुतींतील काही मुद्दे, साहित्यिकांचे गौरव, प्रकाशक आणि लेखक यांच्यातील व्यावहारिक बाजू, साहित्य संमेलने, काव्यवाचने, भाषणे, साहित्यिकांचे आजारपण, साहित्यिकांचे विचारधन आणि आपसातील मतभेद, साहित्यिकांचे सत्कार आदी विषय आले आहेत.