सदस्य:O. Gawade
अपूर्वी चंदेला
[संपादन]अपूर्वी चंदेला ही 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये पारंगत एक भारतीय खेळाडू आहे. ती जागतिक विजेती आहे आणि सध्या 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आहे. भारताचा प्रतिष्ठित क्रीडा सन्मान अर्जुन पुरस्काराने तिला गौरविण्यात आले आहे.
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
[संपादन]अपूर्वी चंदेला हिचा जन्म ४ जानेवारी १९९३ रोजी राजस्थानच्या जयपूर येथे झाला होता. ती क्रीडा पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. तिची आई बिंदू चंदेला बास्केटबॉल खेळत असे आणि तिचे वडील कुलदीप सिंह चंदेला क्रीडाप्रेमी आहेत. तिच्या भावंडांपैकी एकाने काही काळ व्यावसायिक नेमबाजीसुदधा केली आहे. [1]
सुरुवातीला अपूर्वी चंदेला हिला क्रीडा पत्रकार होण्याची इच्छा होती, परंतु २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्राला सुवर्णपदक जिंकताना पाहून ती नेमबाजी करण्यास प्रेरित झाली. ती सांगते की तिचे वडील तिच्या शूटिंगमधील कौशल्यामुळे इतके प्रभावित झाले होते की त्यांनी तिला एक रायफल भेट म्हणून दिली. [1] तिच्या पालकांनी शूटिंगसारख्या महागड्या खेळासाठी तिला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. सुरुवातीला जयपूरमधल्या शूटिंगच्या रेंजवर पोहचण्यासाठी तिला दररोज ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागत असे. नंतर तिच्या पालकांनी लवकरच त्यांच्या घरीच तिच्यासाठी १० मीटर एअर रायफल प्रॅक्टिससाठी शूटिंग रेंज तयार केली. तिची आई तिच्याबरोबर स्पर्धांमध्ये जात असे आणि तिच्या सरावावर बारकाईने लक्ष ठेवत असे. [1]
२००९ मध्ये चंदेलाने अखिल भारतीय शालेय नेमबाजी स्पर्धा जिंकली. देशांतर्गत शूटिंग स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि २०१२मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ती जिंकली. २०१२ ते २०१९ या काळात तिने किमान सहा वेळा विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेती ठरली. [2]
अपूर्वीला तिच्या मोकळ्या वेळेत वाचन करायला आवडते, आणि खेळात चित्त एकाग्र होण्यासाठी ती ध्यान साधनाही करते. [2]
व्यावसायिक कामगिरी
[संपादन]२०१२ पासून अपूर्वी देशांतर्गत स्पर्धांमध्ये १० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये वर्चस्व गाजवत होती, पण २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय मिळविला. अपूर्वी सांगते की हा विजय तिच्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता कारण तिच्या कुटुंबातील १४ सदस्य त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होते. एक वर्षानंतर चांगवॉन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने पदार्पणातच कांस्यपदक जिंकले. [3] यामुळे ती २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. परंतु ऑलिम्पिकमध्ये तिला ३४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ती सांगते की या सुमार कामगिरीने तिला मौल्यवान धडे दिले. [1] यश आणि अपयश दोन्ही पचवून कसे पुढे जायचे, हे ती इथे शिकली असे ती सांगते. अपूर्वी मीतभाषी (introvert) आहे, असं तीच स्वतः सांगते, त्यामुळे क्वचितच ती स्पर्धांमध्ये भावना व्यक्त करताना दिसली आहे. [3]
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत अपूर्वी चंदेलाने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पण २०१९ तिच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी वर्ष ठरले. यावर्षी तिने नवी दिल्लीतील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात २५२.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, शिवाय एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. आपल्याच देशाच्या लोकांसमोर खेळताना अतिरिक्त दडपण होते, पण तिच्या प्रत्येक शॉटनंतर वाजणाऱ्या टाळ्यांमुळे तिला प्रोत्साहनही मिळाले, असे ती सांगते. [4]
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Citizenship | भारतीय |
जन्म |
|
Sport | |
खेळ | 10 मीटर एअर रायफल शूटिंग |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अपूर्वी चंदेलाने आपली जागा पक्की केली आहे, आणि आता तिचे भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. २०२० मध्ये तिने ऑस्ट्रियामधील मेटन कॉप येथे एका खासगी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. [5]
२०१६ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून अर्जुन पुरस्कार, हा प्रतिष्ठेचा क्रीडा सन्मान मिळणे आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च मान होता, असे अपूर्वी सांगते. [1]