सदस्य:दिनराज आपोणकर
पट्टेरी रुईकर ( Danaus Genutia )
भारतातील सामान्य फुलपाखरांपैकी पट्टेरी रुईकर Danaus Genutia हे एक आहे. हे कुंचलपाद कुळातील डॅनाई ( Danainae )या उपकुळातील फुलपाखरू आहे. पंखाच्या बाहेरील बाजूस असलेल्या कुंचल्यासारख्या नक्षीदार संरचनेमुळे हे फुलपाखरू कुंचलपाद कुळात मोडते. रुईकर Danaus chrysippus या सामान्य फुलपाखरापेक्षा याच्या पंखांवरील रंगाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असल्याकारणाने भारतात याला पट्टेरी रुईकर या नावाने संबोधले जाते. या फुलपाखराचे वर्ण 1779 मध्ये प्रथमचं पीटर क्रेमर या डच कीटकशास्त्रज्ञाने केले होते.
वर्णन
हे फुलपाखरू अमेरिकेच्या मोनार्क फुलपाखरू (डॅनॉस प्लेक्सिपस) शी साधर्म्य साधते. याच्या पंखांची लांबी साधारण पंख 7 ते 95 मिलीमीटर (0.28 ते 3.74 इंच) असून नर व मादी फुलपाखराच्या पिवळसर / केसरी तपकिरी रंगाच्या पंखांवर काळ्या रंगाचे पट्टे असतात. पंखांच्या कडा कुंचल्यासारख्या नक्षीदार असून त्या काळ्या असतात आणि त्यावर पांढऱ्या डागांच्या दोन ओळी असतात. पंखांच्या खालील भाग हा वरील भागासारखाच दिसत असला तरी तो भाग थोडासा फिकट असतो .
हे फुलपाखरू अमेरिकेच्या मोनार्क फुलपाखरू (डॅनॉस प्लेक्सिपस) शी साधर्म्य साधते. याच्या पंखांची लांबी साधारण पंख 7 ते 95 मिलीमीटर (0.28 ते 3.74 इंच) असून नर व मादी फुलपाखराच्या पिवळसर / केसरी तपकिरी रंगाच्या पंखांवर काळ्या रंगाचे पट्टे असतात. पंखांच्या कडा कुंचल्यासारख्या नक्षीदार असून त्या काळ्या असतात आणि त्यावर पांढऱ्या डागांच्या दोन ओळी असतात.
लिंग संबंधित फरक ( नर - मादी )
नराच्या मागच्या पंखांवर मोठा काळा डाग असतो, जो मादी पट्टेरी रुईकर फुलपाखरात दिसून येत नाही.मागच्या पंखाच्या पृष्ठीय किंवा वरच्या बाजूस, हा काळा डाग एका फुगवट्याच्या स्वरूपात आपण पाहू शकतो.( फुलपाखराचे पंख पूर्ण उघडे असल्यावरचं हा फुगवटा आपण पाहू शकतो). अधर भागी( व्हेन्ट्रल)मागच्या पंखांवर सबटॉर्नल ब्रँड देखील काळ्या डाग म्हणून दृश्यमान असतो, ज्याच्या मधोमध दृश्यमान पांढरा डाग असतो. हा असा पांढरा डाग पृष्ठीय बाजूला बाजूला आढळून येत नाही. या शुभ्र/पांढरा डागावरून आपण नर फुलपाखरू ओळखू शकतो. कारण मधोमध पांढरा डाग असलेला काळा डाग मादी फुलपाखरात आढळून येत नाही.
अधिवास
पट्टेरी रुईकर संपूर्ण भारत, श्रीलंका, म्यानमार आणि दक्षिण-पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. (न्यू गिनी सोडून). दक्षिण अशियाई भागात याचा अधिवास सामान्यतः आढळून येतो.
ही फुलपाखरे जंगलात, वस्तीशेजारील पडलेल्या कोरडवाहू व कोरड्या व आर्द्र पर्णपाती जंगलांमध्ये तसेच मध्यम ते अतिवृष्टीच्या क्षेत्रात आढळून येतात. तसेच ढासळलेले डोंगर, पठार, आणि नदी तसेच खाडीनजीकच्या डोंगर पट्ट्यात आढळून येतात.
हे फुलपाखरू उडताना धीम्या गतीने कमी उंचीवर उडत उडते.पण असे असले तरी साध्या रुईकरापेक्षा याचा संचार अधिक गतिमान आहे. हे फुलपाखरू मधाच्या शोधात बागांना भेट देते जिथे डेलोकॅरियम, कॉसमॉस, सेलोसिया, लँटाना, झिनिआ इत्यादी झाडे आढळून येतात. महाराष्ट्रात आणि संपुर्ण भारतभर हे फुलपाखरू बहुतांशी रुईच्या झाडावर अधिवास करताना आढळून आले आहे.
शिकाऱ्यांपासून संरक्षण आणि बचाव
पट्टेरी रुईकर या फुलपाखरास सहसा कोणी भक्ष्य बनवत नाही.या फुलपाखरांचा गंध आणि चव अत्यंत घाणेरडा असल्याकारणाने पक्षी यांना खात नाही.याची मादी हेल विशिष्ठ वनस्पतीच्या पानावर आपली अंडी देते. या वनस्पतीचे पान किंवा देठ तोडल्यास त्यातून दुधासारखा पदार्थ स्त्रवतो, अश्या वनस्पतीना आपण दुधी वनस्पती (Milkweed plant) म्हणतो. या फुलपाखराची मादी त्यावर आपली अंडी घालते. फुलपाखरात विकसित होण्याच्या दरम्यान सुरवंट त्या वनस्पतीची पणे खाऊन आपली उपजीविका पूर्ण करतात म्हणून त्यातील विषारी अंश फुलपाखराच्या शरीरात येतात.सुरवंटची वाढ झाल्यावर ते स्वतःला कोषात गुंडाळून घेतात. विकासादरम्यान विषारी द्रव्य असलेल्या झाडांची पाने खाल्ल्याने ती विषारी द्रव्ये सुरवंटाच्या व पर्यायाने फुलपाखरांच्या शरिरात जमा होतात. बऱ्याचदा हे फुलपाखरू एस्केल्पीडियासी कुळातील वनस्पतींमधून विष प्राप्त करते. याचसोबत ही फुलपाखरे, क्रोटालारिया, हेलियोट्रोपियम आणि इतर वनस्पतींच्या रसातून पायरोलीझिडाइन अल्काभ (Alkaloids ) ग्रहण करतात आणि शरीरात साठवतात.
जीवनचक्र
हे फुलपाखरू त्याच्या अस्कीलीपियाडसीच्या कुळातील कोणत्याही वनस्पतीच्या पानांखाली अंडी घालते. या फुलपाखराचा सुरवंट काळ्या रंगाचा असून त्यावर निळे-पांढरे आणि पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याच्या शरीरावर शुंण्डकाच्या (Tentacles ) तीन जोड्या असतात. तो प्रथम अंडकवच खातो आणि नंतर झाडाची पाने आणि वनस्पतिचे इतर भाग खातो. त्याचा कोष ( chrysalis )हिरव्या रंगाचा असून त्यावर सोनेरी पिवळे ठिपके असतात.
फोटो
-
पट्टेरी रुईकर समागम करताना, बिहार, भारत
-
अंडी
-
सुरवंट
-
कोष
-
मादी पट्टेरी रुईकर, केरळ
-
सबटोर्नल फुगवट्यासह पट्टेरी रुईकर,नर