दर्शन बुधरानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दर्शन बुधरानी
जन्म १६ जुलै १९९८
गोधरा, गुजरात
पेशा संगीत निर्माता


दर्शन बुधरानी (जन्म १६ July १९९८ - गोधरा, गुजरात) एक भारतीय संगीत निर्माता आहे ज्याला नंद घेर आनंद, इश्क तेरा आणि धीमे धीमे या गाण्यांसाठी ओळखले जाते.[१] २०१९ मध्ये त्याला गणा अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट संगीत निर्माता पुरस्कार मिळाला.

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

बुधरानीचा जन्म ६ जुलै १९९८ रोजी गोध्रामध्ये झाला. २०१९ मध्ये त्याने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, गोध्रा येथून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यानी इव्हेंट मॅनेजर म्हणून काम केले.[२] २०१८ मध्ये संगीत निर्माता म्हणून त्यानी गुजराती चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.[३]

निर्माता कारकीर्द[संपादन]

२०१६ साली दर्शनाने बेबी मेकअप करना छोड या गाण्यात सह-निर्माता म्हणून काम केले. २०१८ मध्ये त्याने आणी माने या गाण्याने गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने धोलीदा गाण्यात सहयोगी निर्माता म्हणून काम केले. २०१९ मध्ये त्याने सहाय्यक निर्माता म्हणून धीमे धीमे आणि इश्क तेरा गाण्यात काम केले. २०२० मध्ये ते नंद घेर आनंद गाण्याचे निर्माते होते.[४]

निर्मिती केलेले संगीत[संपादन]

गाण्याचे नाव वर्ष श्रेणी
बेबी मेकअप करना छोड २०१६ सह-निर्माता
आणी माने २०१८ निर्माता
धोलीदा २०१८ सहयोगी निर्माता
धीमे धीमे २०१९ सहाय्यक निर्माता
इश्क तेरा २०१९ सहाय्यक निर्माता
नंद घेर आनंद २०२० निर्माता

पुरस्कार[संपादन]

गणा अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट संगीत निर्माता पुरस्कार (२०१९)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Producer Darshan Budhrani collaborates with Parth Doshi and Satish Brahmbhatt for his next project - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Did You Know; Darshan Budhrani was an event manager before producing albums - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Exclusive! Darshan Budhrani: Today I have lit earthen lamps in memory of all those frontline corona warriors - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Producer Darshan Budhrani and Singer Herry Nakum to collaborate for an interesting project - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

दर्शन बुधरानी आयएमडीबीवर