Jump to content

होलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होलार समाज, holar caste
होलार समाज logo

होलार ही अनुसूचित जातीमधील अतिशय मागास जात आहे. होलार या शब्दाचा अर्थ भूमिपुत्र असा होतो. होलार समाजामध्ये प्रामुख्याने देवकते,ऐवळे, जावीर, हातेकर, गेजगे, करडे, भंडगे, गुळीक, भजनावळे, पारसे , नामदास , बिरलिंगे, इ आढळून येतात. होलार समाज ही स्वतंत्र जात आहे. काही वेळा होलार हे चांभार जातीसारखेच आहेत, असे गैरसमज आहेत. चांभार जातीचे लोक हे चपला तयार करतात, तर होलार जातीचे लोक चपला किंवा चामड्याच्या वस्तूंची दुरुस्ती करतात. तसेच ग्रामसंस्कृतीमध्ये वाजंत्रीचे काम करीत असे. तदनंतर काही लोक दोरखंड बनवण्याचे काम करीत त्यामुळे त्यांच्या या व्यवसायावरून त्यांच्या जातीच्या नोंदी चांभार, मांग अशा झाल्याचे दिसून येते. मात्र होलार हा समाज स्वजातीय विवाह करणारा (endogamous) समाज आहे. हा समाज चांभार व मांग या समाजाच्या मुला मुलींशी विवाह करीत नाही. होलार, चांभार आणि मांग या समाजाची परंपरा काही प्रमाणात सारखीच आढळत असली तरी होलार समाजा अंतर्गत विवाह ही परंपरा स्वतंत्रपणे जपली आहे.

महाराष्ट्रातील सांगली, सांगोला, पुणे, सोलापूर, सातारा आणि नागपूर या जिल्हयामध्ये या समाजाची लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळून येते. शिक्षणाचा अभाव, उत्पन्नाच्या संधीनच अभाव, रूढी परंपरांचा पगडा, इ. घटक या समाजाच्या मागासलेल्या स्थितीस कारणीभूत आहेत. पारंपारिक व्यवसायात असल्याने हा समाज आपली प्रगती करू शकला नाही. या समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी, मागासलेल्या व भटक्या स्वरूपामुळे या जातीच्या लोकांकडे अशा कागदपत्रांचा अभाव दिसून येतो. त्यासाठी “५० वषापूवीचे वास्तव्याचे पुरावे” मिळवण्यात या जातीच्या लोकांना अडचणी येतात. शिवाय, होलार समजासंबंधी फारसे संशोधन सुद्धा झालेलेदिसत नाही. परिणामी या लोकांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठीच्या योजना असूनही त्यापासून होलार समाज वंचित राहिलेला दिसून येत आहे.