Jump to content

सदस्य:Vaishali More

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिबर्टी स्टेट पार्क

लिबर्टी स्टेट पार्क हे अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील जर्सी शहरातील उद्यान आहे. हे उद्यान जर्सी शहरात अप्पर न्यू याॅर्क खाडीवर बनवले गेले असून याच्या विरूद्ध बाजूला लिबर्टी आयलंड आणि एलिस आयलंड नावाची दोन बंदरे आहेत. हे उद्यान १९७६ साली, द्विवार्षीक महोत्सव साजरा करण्यासाठी उघडले गेले आहे. न्यू जर्सी उद्यान आणि वनीकरण विभागामार्फत याची देखरेख केली जाते. या उद्यानाने १,२१२ एकर (४९० हेक्टर) इतकी जागा व्यापली आहे. उद्यानाच्या तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूला भूभाग अशी याची संरचना आहे. याच्या उत्तर बाजूला मारिस कालवा बिग बेसिन आणि दक्षिण आणि पूर्व बाजूस अप्पर न्यू याॅर्क खाडी असा जलभाग आहे.

छायाचित्र:

प्रकार: अर्बन पार्क

स्थान: जर्सी सीटी, न्यू जर्सी

निर्देशांक: 40 ° 42′15 ″ N 74 ° 02′57 ″ W

क्षेत्रफळ: 1,212 एकर (4.90 किमी^2)

संचालक: न्यू जर्सी उद्यान व वनीकरण विभाग

स्थापना: १९७६