Jump to content

सदस्य:Patil Srushti/dhulpati2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मानवी इतिहासात २००७ या वर्षाचे टोकाचा बिंदू म्हणून वर्णन केले गेले आहे. जगातील निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहते. भारतात २००१ च्या जनगणनेनुसार २८% लोकसंख्या शहरी भागात रहाते ज्याचे प्रमाण २०२१ पर्यंत ४०% पर्यंत होईल. शहरे आर्थिक वाढीची केंद्रबिंदू आहेत आणि भारतीयांच्या दैनंदिन वापरातील जवळपास निम्म्या वस्तू शहरी भागातून येतात. शहरी भागात दिसणारी ही उच्च उत्पादकता दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. शहरी आर्थिक कामे वीज, दूरसंचार, रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांवर तसेच पुरवठा आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या नागरी पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत. [] संपन्नता आणि जीवनशैलीची निवडी यांवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन अवलंबून आहे.विकसित देशांचे हरितगृह वायूंचे उत्सर्जन विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे.[] भारतात, शहर पातळीवर हवामानविषयक कृतींबद्दल अनेक उपक्रम आहेत. ज्यामध्ये अहमदाबादमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सूरतमधील घनकचरा व्यवस्थापन, चंदीगडमधील हिरव्यागार जागा, आणि एलईडी पथदिवे असे मार्ग स्वीकारल्यामुळे ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा झालेली दिसते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ (PDF) https://irade.org/Program%20Details%20&%20reading%20Materials/Reading%20Materials/Impact%20on%20Indian%20Cities.pdf. line feed character in |शीर्षक= at position 34 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (PDF) http://siteresources.worldbank.org/INTUWM/Resources/340232-1205330656272/4768406-1291309208465/PartIII.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.downtoearth.org.in (इंग्रजी भाषेत) https://www.downtoearth.org.in/blog/energy/there-s-need-for-city-level-climate-actions-63107. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)