Jump to content

सूर्याजी सदाशिव महात्मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्याजी सदाशिव महात्मे (१८३७:गोवा – १३ डिसेंबर, १८९९:मुंबई) हे रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे लेखक, मुलांसाठीच्या मासिकाचे संपादक, ग्रंथप्रकाशक आणि वामन पंडितांच्या साहित्याचे संपादक होते.

यांचे शिक्षण गोव्यात झाले. मराठीखेरीज कोकणी, इंग्लिश, पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषा त्यांना अवगत होत्या.

वेषधारी पंजाबी ही त्यांची रहस्यमय आणि सामाजिक कादंबरी मराठीतील पहिलीच रहस्यकथा समजली जाते.

महात्मे यांनी मुलांसाठी आनंदलहरी हे मासिक सुरू केले. त्यात गोष्टी, श्लोकरूपी कोडी आणि जुन्या मराठी वाड्मयातील उतारे असत. जरी हे मासिक पाच सहा महिनेच चालले, तरी १८६१ साली सुरू झालेले मुलांचे हे पहिले मासिक, म्हणून मराठी साहित्य जगतात त्याची दखल घेतली जाते.

वामन पंडित यांचे साहित्य क्रमश: प्रकाशित करण्यासाठी यांनी 'वामनग्रंथ' नावाचे मासिक सुरू केले. त्यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. ते त्यांनी आपल्या वामन ग्रंथ या मासिकातून प्रसिद्ध केले. मराठी साहित्य जगतातील ही मोलाची कामगिरी समजली जाते.

पुस्तके

[संपादन]
  • तंतुवाद्य (सतारवादनावरील पुस्तक) - अशाप्रकारचे हे मराठीभाषेतील पहिलेच पुस्तक आहे.
  • वामन पंडितांची 'स्फुट रचना (संपादित)
  • वामन पंडितांची यथार्थ दीपिका (संपादित)
  • वेषधारी पंजाबी (रहस्यमय सामाजिक कादंबरी) आणि अन्य रहस्य कादंबऱ्या