Jump to content

सदस्य:Rohit Kavade

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
     जुना राजवाडा...
प्रत्येक शहराचा एक केंद्रबिंदू असतो. तसा कोल्हापुर केंद्रबिंदू जुना राजवाडा आहे. जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानाच्या राजधानीची दौलदार वास्तू. वास्तू दुमजली , काही भागात तीन माजली व वाडयाच्या आतल्या भागात सहा सुंदरी दगडी चौक व कारंजा असणारी. छत्रपती शिवाजी महाराजनंतर त्यानच्या सुनबाई ताराराणी यांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. संस्थानाची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात आणली. शिवरायांनी इतके थेट नटे असणारा हा राजवाडा म्हणजे तत्कालीन मराठा बांधकाम शैलीचा एक नमुना आहे. त्या काली खजिना, टांकसाळ, दरबार अशी वेगवेगळी दलाने होती.  
        १८२७ ते १८३८ या कालावधीत मराठी राज्याच्या कारभार करताना जुना राजवाड्यात देखण्या नगरखान्याची इमारत उभी केली. नगारखान्याच्या कमानीत परिसरात प्रवेश करतात. उत्तर हिदुस्तानांतून कसबी पठारावतांनी महाराजांनी कोल्हापुरात आणले होते. दरमहा त्यांना २५ ते ३० रुपये मजुरी होती. जोतिबा डोगरावरून गायमुखाजवळून घोटीव दगड कोल्हापुरात आणण्यात आला. त्यासाठी पाच हजार कामगार होते. दगड कोल्हापुरात आणले  होते. सण १७५६ ते १८३४ या काळात नगारखाना तयार झाला. 
       जुन्या राजवाड्याचा नगारखाना हि स्वतंत्र वास्तू आहे. राजवाडयांनंतर हा नगारखाना बांधला आहे. पण दगडी चार मजली हा नगारखाना म्हणजेच जुना राजवाडा आहे. अशी बहुतेकींची समजूत आहे. या नगारखान्यात गुळगुळीत संगमरवरी दगडात आपले प्रतिबिब दिसू शकते इतकी नजाकत आहे. 
      हा झाला वस्तूचा भाग ; पण जुन्या राजवाड्यात आवारात १८५७ च्य उठावाचा रक्तरंजित इतिहास घडला आहे. हा इतिहास एका सलग साखळीत लोकांसमोर आलेलाच नाही. अशी परिस्तिथी आहे. १८५७ च्या उठावात चिमासाहेब महाराजांनीच उठावाला बाळ दिले या संशयावरून चिमासाहेब महाराजांना ब्रिटिशयनीं कोल्हापुरातून कराचीला नेऊन नजरकैदेत ठेवले. याच राजवाड्यात झालेला उठाव ब्रिटीशानी मोडून काढला. क्रातिकाराना राजवाड्याच्या परिसरात मृत्यूदंडास सामोरे जावे लागले. स्वातंत्र लाढ्यतील उठावाचा जुना राजवाडा हा एकमेव साक्षीदार आहे.
      त्यामुळे जुना राजवाडा हे केवळ वास्तू नव्हे, तर तेथे इतिहास दडला आहे. स्वातंत्र लढयातील उठावाचा इतिहास घडला आहे. पण या वास्तूची हि बाजू ठळकपणे समोर न आल्याने जुना राजवाड्याच्या वाट्याला अनास्था झाली आहे. जर खरोखर या वास्तूचे संवर्धान करायचे ठरवले तर जुन्या राजवाड्याच्या परिसराची गणना देशातल्या एका चांगल्या चौकात होऊ शकणार आहे.
      यापुरवी हॉटेल कमीटीने जुन्या राजवाड्यातील फेरीवाले,हाथगाडीवाले, टपरीवाले, याना हटवण्याची सूचना केली. परिसरातील जाहिरात फलक काढण्यास सांगितले होते. या ऐतिहासिक सुंदर वास्तूचे संवर्धान करणे,तिचे देखभाल करणे काळाची गरज बनली आहे. तसेच कोल्हपूरचा मातीचा वारसा जपायचा असेल तर जुन्या राजवाड्याचा परिसर लखलखीत होण्याची गरज आहे.


https://www.bing.com/maps/directions?rtp=adr.~pos.16.694480895996094_74.22438049316406_Bhavani+Mandap%2c+Kolhapur%2c+Maharashtra+416002_Juna+Rajwada_