Jump to content

धूळपाटी/टोपणनावानुसार हिंदी साहित्यिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोपणनावाने लिहायची प्रथा, आज एकविसाव्या शतकात, मराठीतून जवळपास हद्दपार झाली असली तरी हिंदीत ती अजूनही प्रचारात आहे. हिंदीत लेखक-कवीच काय पण पत्रकारही छद्मनावाने लेखन करतात. उर्दू शायरांमध्ये आपल्या नावाचा थोडासा अंश घेऊन त्या आपल्या जन्मगावाचे नाव जोडायची पद्धत सर्रास रूढ आहे. साहिर लुधियानवीचे खरे नाव अब्दुल हयी होते हे किती लोकांना माहीत असेल? राहत इंदौरी, जोश मलीहाबादी, अकबर इलाहाबादी ही या प्रथेची काही ठळक उदाहरणे. हिंदी-उर्दू साहित्यिकांची/पत्रकारांची अशी छद्मनावे खालील यादीत आहेत. छद्मनावे कंसात दिली आहेत  :

  • अस्ताद दिनशा गोरवाला - ए.डी. गोरवाला, ओपीनियनचे संपादक (विवेक)
  • टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक - श्यामलाल (अदीब)
  • दुर्गादास - हिंदुस्तान टाइम्सचे मुख्य संपादक (इन्साफ)
  • भगतसिंग - वर्तमानपत्रांत लिहिण्यासाठी घेतलेले नाव बलवंत सिंह.
  • राजेंद्र माथुर - देश-विदेशातील राजकारणावर लिहिणारे सदर लेखक, नई दुनिया/नवभारत टाइम्सचे संपादक (अनुलेख)




(अपूर्ण)