बिंदुमाधव खिरे
बिंदुमाधव खिरे | |
---|---|
टोपणनाव | बिंदू |
जन्म | पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, समाजसेवा, नाटककार |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
साहित्य प्रकार | नाटक, लघुकादंबरी, माहितीपर |
विषय | समलैंगिकता, एच.आय.व्ही.-एड्स, समलैंगिक प्रेमकथा |
चळवळ | लैंगिक अल्पसंख्यांकांचे हक्क |
संकेतस्थळ | http://samapathik.org/ |
बिंदुमाधव खिरे हे पुणे, महाराष्ट्र, भारत येथील एलजीबीटीक्यू+ हक्क कार्यकर्ते आहेत. त्यांनी समपथिक ट्रस्ट नावाने[१] एक समाजसेवी संस्था चालू केली जी पुणे जिल्ह्यात एलजीबीटीक्यू+ विषयांवर काम करते.[२] पुण्यातील पुरूषांबरोबर लैंगिक संबंध असलेल्या पुरुषांना (एमएसएम) समाजासाठी त्यांनी २००२ मध्ये समपथिक ट्रस्टची स्थापना केली.[३] त्यांनी लैंगिकतेच्या विषयांवर संवादात्मक आणि वास्तववादी स्वरूपात देखील लिखाण केले आहे, ज्यात संपादित केलेल्या कथा, नाटके, लघु कथा आणि माहितीपुस्तके आणि पुस्तिका समाविष्ट आहेत.[४]
वैयक्तिक जीवन
[संपादन]भारतात एलजीबीटी समुदायाबरोबर काम करण्यासाठी खिरे यांनी अमेरिकेत संगणक तंत्रज्ञ म्हणून काम केले आणि 2000 मध्ये पुण्यात परतले.[५] सॅन फ्रान्सिस्कोच्या भारतीय समलिंगी पत्रिका, त्रिकोनच्या कार्यक्रमांमधील सहभागामुळे बिंदुमाधव यांना स्वतःला समलिंगी पुरुष म्हणून स्वीकारण्यास मदत झाली.[३] भारतीय असणे आणि सॅन फ्रान्सिस्को मधील स्थानिक क्वियर समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग त्यांच्या अमेरिकेमधील वास्तव्यातील महत्त्वाचा भाग होते; ह्या प्रक्रियेमुळे त्यांनी पालकांना स्वतःच्या लैंगिकते विषयी उघडपणे सांगितले आणि भारतात परत येऊन भारतातील एलजीबीटी समुदायासोबत काम करू लागले.[५][६]
कार्य
[संपादन]समपथिक ट्रस्ट
[संपादन]अशोक राव कवी आणि हमसफर ट्रस्ट, यांच्या सहयोगाने बिंदुमाधव खिरे यांनी २००२ मध्ये पुणे येथे समपथिक ट्रस्ट ही संस्था सुरू केली.[१][७] तेव्हापासून समपथिक ट्रस्टने पुण्यातील एलजीबीटी समुदायापर्यंत पोहचण्यासाठी, चळवळीसाठी आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.[८]
- एचआयव्ही / एड्स, हेल्पलाइन - २००२ मध्ये एमएसएम समुदायासाठी बिंदुमाधव यांनी टेलिफोन हेल्पलाइन सेवा सुरू केली.[९]
- ड्रॉप इन सेंटर - समुदायाच्या बैठकीसाठी, अनौपचारिक कार्यक्रमांसाठी जुलै २०१५ पर्यंत केंद्र कार्यरत होते आणि निधी अभावी हे बंद झाले.[१०]
- नियमित एचआयव्ही चाचणी शिबिरे -
- ब्युटी पार्लर/प्रशिक्षण केंद्र - पुर्पल लोटस ब्यूटी सलून आणि ट्रेनिंग अकादमीच्या नावाने ब्युटी पार्लर आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले, विशेषतः पुण्यातील तृतीयपंथी समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्यात स्त्रियांसाठी असलेल्या ब्युटी पार्लर्समध्ये सेवा नाकारल्या जातात त्यांच्यासाठी हे काम करत होते.[११][१२] हे फार काळ चालू राहिले नाही आणि पुढील काही महिन्यांमध्ये समाजाचा प्रतिसाद आणि इतर तांत्रिक कारणास्तव ते बंद झाले.
पुणे प्राईड परेड
[संपादन]बिंदुमाधवने २०११ मध्ये पुणे प्राईड मार्च सुरू केला.[१३] पुणे प्राईडमध्ये १०० लोकांच्या सहभागाने पहिल्या मार्चची सुरुवात झाली आणि २०१८ पर्यंत ते ८०० सहभागी झाले.[१४]
अद्वैत क्विअर चित्रपट महोत्सव
[संपादन]चित्रपट हे शिक्षणाचे चांगले माध्यम आहे असा विश्वास असलेल्या बिंदुमाधव यांनी २०१४ मध्ये प्रथम चित्रपट महोत्सव सुरू केला.[१५] महोत्सवाच्या पहिल्या वर्षानंतर, आयोजकांकडे पुरेसा निधी जमा होईपर्यंत महोत्सव थांबावावा लागला. २०१७ च्या डिसेंबर महिन्यात पुण्यातील दुसरा चित्रपट महोत्सव झाला.[१६] २०१८ च्या ऑक्टोबरमध्ये तिसरा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला, चित्रपट महोत्सवासाठी निधीची कमतरता ही मोठी समस्या होती.[१७][१८]
मूकनायक - समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी साहित्य संमेलन
[संपादन]एलजीबीटी समुदायातील उदयोन्मुख लेखकासाठी मंच तयार करण्याच्या उद्देशाने, बिंदुमाधव यांनी मूकनायक एलजीबीटी साहित्य संमेलन सुरू केले. मूकनायक हे नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्र मूकनायक याच्यापासून प्रेरणा घेऊन देण्यात आले. डिसेंबर २०१८ मध्ये पुण्यात पहिले मराठी एलजीबीटी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.[१९][२०] छापील आणि स्वयं-प्रकाशन मंचावर कविता व नाटक लेखन करणारे अनेक समलैंगिक, ट्रान्स-व्यक्ती यांनी संमेलनात सहभाग घेतला आणि त्यांचे लिखाण सादर केले. स्वयं-प्रकाशन मंचा संबंधित तज्ञांच्या सत्रांचाही महोत्सवात समावेश होता.[२१]
क्वियर कट्टा - अनौपचारिक आधार गट बैठका
[संपादन]डीआयसीच्या, सल्लागार केंद्रासारख्या औपचारिक संरचनेच्या अडचणी लक्षात घेऊन बिंदुमाधव यांनी अनौपचारिक बैठका सुरू केल्या,[२२] जिथे एलजीबीटी समुदायाचे किंवा बिगर समुदायाचे कोणीही येऊ शकेल आणि त्याच बैठकीमध्ये बिंदुमाधव आणि इतरांना भेटू शकतील.[२३] अशा बैठका कोणत्याही विषयपत्रिके शिवाय, फक्त गप्पा मारण्यासाठी महिन्यातून एकदा आयोजित केल्या जातात. या बैठका बागा/महाविद्यालयांची उपहारगृहे/सार्वजनिक ठिकाणी आयोजित केल्या जातात, जेथे कोणीही येऊ शकेल आणि सामील होऊ शकेल.[२४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "संग्रहित प्रत". 2019-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-29 रोजी पाहिले.
- ^ Jul 29, Pune Mirror | Updated:; 2016; Ist, 17:38. "संग्रहित प्रत". 2019-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ a b https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/now-we-are-rid-of-the-code-that-disempowered-us-bindumadhav-khire/articleshow/65817915.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Chanda-Vaz, Urmi. https://scroll.in/article/742057/gay-literature-is-firmly-out-of-the-closet-in-india-and-winning-readers-over. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Rao, R. Raj; Sarma, Dibyajyoti (2009). Whistling in the Dark: Twenty-One Queer Interviews. SAGE Publications. pp. 257–259. ISBN 9788178299211.
- ^ https://search.library.utoronto.ca/details?8829428&uuid=1b1d385a-ea4a-483f-97ac-4c57f256c537. Missing or empty
|title=
(सहाय्य)[permanent dead link] - ^ Trikone. Trikone. 2002.
- ^ https://indianexpress.com/article/cities/pune/fund-crunch-forces-ngos-to-quit-hiv-prevention-project/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://archive.indianexpress.com/news/now-a-helpline-for-the-gay-fraternity/384521/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Mukherjee, Jui. http://simc-wire.com/not-so-gay-after-all/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Mar 8, Vijay ChavanVijay Chavan | Updated:; 2011; Ist, 00:32. "संग्रहित प्रत". 2019-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Indiamarks. "संग्रहित प्रत". 2019-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-29 रोजी पाहिले.
- ^ "LGBT community holds rally in city". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Pune pride raises a toast to equality". dna. 2018-06-04. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "City to host its 1st LGBT film festival". The Indian Express. 2014-08-23. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "On pause for three years due to lack of funding, Pune queer film festival makes a comeback tomorrow". The Indian Express. 2017-12-29. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "'Advait' Queer Film Festival to be held on Oct 6". www.sakaltimes.com. 2019-02-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "An interview with Bindumadhav Khire". TEDxPICT BLOG. 2018-09-12. 2019-02-03 रोजी पाहिले.
- ^ "'Not his or her story, it is time to tell our stories' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "मूकनायकांचा संवेदनशील हुंकार". www.esakal.com. 2019-02-02 रोजी पाहिले.
- ^ "एलजीबीटीआय साहित्य संमेलन होणार दरवर्षी". Maharashtra Times. 2018-11-26. 2019-02-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "No 'safe zone' for transgenders on Pune campuses, still". 2018-08-31. 2019-02-03 रोजी पाहिले.
- ^ "First meet of LGBT community held in a canteen near Garware College". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-02-03 रोजी पाहिले.
- ^ "No judgement, only acceptance and support at this queer katta". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-02-03 रोजी पाहिले.