जयश्री देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयश्री देसाई या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत.

लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५ च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.

जयश्री देसाई यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • तरकश (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जावेद अख्तर)
  • राजयोगी नेता अटलबिहारी वाजपेयी
  • अयोध्या आंदोलन : काल आज आणि उद्या
  • अक्षय गाणे (अनुवादित, मूळ इंग्रजी The Voice of a Nation लेखिका - पद्मा सचदेव)
  • कैफी आणि मी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - बेगम शौकत कैफी)
  • शापित सौंदर्यभूमी : पूर्वांचल
  • सेलिब्रिटीज डेस्टिनेशन (मार्गदर्शनपर)