गुराखी (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुराखी हे वृत्तपत्र मुंबई येथे छापून येत होते आणि या पत्राची सुरुवात १८९९ साली होती. त्याचे पहिले संपादक हे भाट्ये होते.[१]

पुण्यातील बंदोबस्ताचा जुलूम आयेस्ट यांचा खून टिळकांवरील १८९७चा राजद्रोहाचा खटला इत्यादी धामधुमीच्या काळात त्यात सर्व प्रकरणाबाबत लेखनामुळे खटला होऊन गाजलेले त्या काळातली एक पत्र म्हणजे गुराखी हे होय. हे पत्र मुंबईत निघत असे आणि ते दैनिक होते. हे त्याची खास वैशिष्ट्ये होती. विनायक नारायण भाट्ये हे पत्राचे चालक व संपादक होते. पशुवैद्यक महाविद्यालयात मुंबईत शिक्षण घेत असल्याने पुण्याचे लक्ष्मण नारायण जोशी हे वडिलांकडून मिळणारे पैसे अपुरे पडू लागल्याने स्वतंत्र कमाई करण्याच्या उद्देशाने या पत्रात ते लिहीत असत. इंदुप्रकाश या मुंबईतल्या दुसऱ्या पत्रात त्याच हेतूने लक्ष्मण नारायण जोशी हे लिखाण करीत असत. गुराखी पत्र गाजले ते त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला भरण्यात आल्याने गाजले.

पहिले अंक[संपादन]

गुराखी पत्र २६ मार्च १८९९ साली त्यांचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता.

पहिले संपादक मंडळ[संपादन]

गुराखी पत्राचे पहिले संपादक हे विनायक नारायण भाट्ये हे होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेले, रा. के. (२००४). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. pp. ४८४, ४८५.