मनी प्लांट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Money plant1

वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट(शास्त्रीय नाव - Epipremnum aureum) लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.[१][मृत दुवा] मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते. या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करतात.[२]

मनी प्लांटला गोल्डन प्रोथाॅस, सिलोन वेल, हंटर्स रोब. आयव्ही आॅरम, सिल्व्हर व्हाईन, टॅरो व्हाईन आणि साॅलोमन आयलॅंड्'ज आयव्ही ही अन्य नावे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मनी प्लांटची गोष्ट." Majha Paper. 2019-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ Webdunia. "वास्तू घरात लावा मनी प्लांट, पण काटेरी रोप ठेवू नये". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत). 2019-03-17 रोजी पाहिले.