सदस्य:Manjusha Gauns Dessai

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    

मी मंजुषा गांवस देसाई. केपे तालुक्यातील शेल्डे या गावात राहते. गोवा विद्यापीठातील मराठी विभागाची विध्यार्थिनी आहे. मला वाचनाची आवड आहे.    

 शेल्डे गावातील जत्रेचे वेगळेपण

केपे तालुक्यातील शेल्डे हा गाव निसर्गरम्य ठिकाण आहे. हिरव्यागार शेती, कुळागरानी नटलेला तसेच आजूबाजूला शहरानी वेढलेल्या ह्या गावात अनेक सोयी उपलब्ध आहेत. विकसित गावाला सांस्कृतिक पार्श्वभूमीही चांगली आहे. गावात "सातेरी शांतादुर्गा" देवीचं देऊळ आहे. एकाच घोडयावर दोन देवी बसलेल्या आहेत. एकाच रंगाच्या वस्त्र दोन्ही देवी धारणा करतात. देवीच्या जत्रेच खास वैशिष्ट आहे. बारा वर्षानी बारा दिवस दिवजोत्सवाची जत्रा होत असते. दिवजोत्सवाची जत्रा साजरा करण्यापूर्वी डुक्कर मारला जातो. जर डुक्कर मारला नाही तर दिवजोत्सवाची जत्रा साजरा करता येत नाही. डुक्कर मारण्यासाठी गावात भोवणी घातली जाते. डुक्कर मारल्यानंतर देवीच्या महाजनाकडून बारा दिवसाचे सुतक पाळले जाते. त्यानंतर बारा दिवस जत्रा होते. जत्रेच्या शेवटच्या दिवशी महाजनाच्या सुवासिनी कडून दिवजोत्सव साजरा केला जातो. लहान मुली, सुवासिनी ह्याचा आनंदाने सहभाग असतो. त्यानंतर जत्रेची समाप्ती होते. गावात काही देवाच्या जागेवर कोरीव काम केलेले दगडी पाशाण आहेत. असा सांस्कृतिक इतिहास आमच्या गावचा आहे.

 कवयित्री अनुया शिरोडकर ह्याची मुलाखत

नमस्कार! मी मंजुषा गांवस देसाई, गोवा विद्यापीठातील मराठी विभागाची विध्यार्थीनी, गोमंतकातील साहित्यिकाची मुलाखत हा आमचा स्वाध्यायाचा विषय. त्या विषयानुसार मी अनुया शिरोडकर ह्याची मुलाखत घेतली. अनुया शिरोडकर ह्या पत्रकार क्षेत्रात आहेत. तसेच त्या गोमंतकातील आघाडीच्या कवयित्री आहेत. - नमस्कार मॅडम! माझ्या मुलाखातीसाठी तुमचं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे कि तुम्ही तुमची थोडक्यात ओळख आम्हाला सांगावी. - नमस्कार! सर्वात प्रथम मी गोवा विद्यापीठातील मराठी विभागाच्या शिक्षकाची मी अभिनंदन करते कि त्यानी गोमंतकातील साहित्यिकाची मुलाखत हा विषय विधार्थीना स्वाध्यायासाठी दिल्यामुळे कारण हा एक चांगला उपक्रम आहे. माझी ओळख म्हणजे मी पत्रकार क्षेत्रात आहे. मी दैनिक तरुण भारतची फातोर्डा प्रतिनिधी म्हणून काम करते. तसेच दक्षिण गोवा पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणी सदस्या, चिन्मय मिशन मडगावच्या कार्यकारिणी सदस्या, गोमंत विद्यानिकेतन संस्थेच्या आजीव सभासद, संस्कार भारतीच्या मडगाव प्राताशी अध्यक्ष, गोवा महिला क्रिकेटच्या माजी संस्थापक उपाध्यक्ष अशा सर्व ठिकाणी मी काम केले. तसेच जायंट्स इंटर‌नेशनल ग्रुप ऑफ सहेली, गोमंत विद्यानिकेतन ग्रंथालय तसेच अगरवाल संस्कृत पाठशाला, बोर्डा यांच्यातर्फे विशेष गौरव, शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण महिला मंचतर्फे सत्कार, शिक्षक विकास परिषदेतर्फे राज्यातील ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मान, श्री परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने गौरव, दक्षिण गोवा पत्रकार संघटनेतर्फे सत्कार झाला, अशा अनेक ठिकाणी माझे गौरव, सत्कार झाले आहेत. - तुमचे कोणकोणते साहित्य प्रकाशित झाले आहेत? - मला कविता करण्याचा छंद असल्यामुळे माझे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि तिसरे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पहिला कवितासंग्रह ‘मन’ हा आहे. दुसरा कवितासंग्रह ‘ग्रीष्मा’ हा आहे. ‘मन’ ह्या कवितासंग्रहामध्ये त्यांनी मनाला स्पर्श करणार्याआ संवेदना मांडल्या आहेत. तर ‘ग्रीष्मा’ ह्या कवितासंग्रहामध्ये त्यांनी महिलांच्या व्यथा मांडल्या आहेत. स्त्रीच्या प्रेमातील सफलता व तिला प्रेमात फसवण तसेच मानवी जीवन व निसर्गावर आधारित कविता लिहिल्या आहेत. समाजातील काही वाईट गोष्टी अगदी चिमटीत पकडल्यासारखे कवितेत मांडल्या आहेत. कवयित्रीने समाजाचे प्रतिंबिब कवितासंग्रहातून उतरवलेले आहे. पूर्वीचा ठसा आजही कायम उमटत आहे. पूर्वीचे वाईट विचार आजही वावरत आहे पण ते गुदमरमतात. कोणाला पटतात तर कोणाला पटत नाहीत. असे विषय त्यांनी हातळलेले आहेत तसेच ‘आम्ही दुर्गा’ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महिलांच्या कर्तव्याबद्दल, त्याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांनी त्या पुस्तकात लिहिले आहे. महिलांची उंच भरारी त्यानी शब्दातून मांडली आहे.


- तुम्हाला गोमंतकीय साहित्याबद्दल काय वाटते? - गोमंतकीय लिखित साहित्याची परंपरा १५ व्या शतकापासून म्हणजेच कृष्णदास शामा यांनी लिहिलेल्या श्रीकृष्ण चरित्र कथा या ग्रंथापासून मानली जाते. गोमंतकीय मराठी साहित्यातला हा पहिला ग्रंथ मानला जातो. याच्यानतंर सोयरोबानाथ आंबिये, विठ्ठल केरीकर, कृष्ण्भट बांदकर, गोदावरी तळावलीकर, इत्यादी संत कवीची कविता लिहिलेली दिसते. त्यानतंरच्या कालखंडात फादर स्टीफस, फादर कृवा, याची मराठी साहित्य निर्मिती दिसते. पोर्तुगीज कालखंडामध्ये मराठी साहित्य निर्मितीवर भरपूर बंधने आलेली दिसतात. तरीदेखील त्या कालखंडात वृत्तपत्रातून भरपूर साहित्य निर्मिती झालेली दिसते. त्या काळातील आनंदलहरी, प्रभात, भारत, देश सुधारणेच्चू ही महत्वाची वृत्तपत्रे होती. यापैकी भारतकार गो. पु. हेगडे देसाई याचे वृत्तपत्र विषयक काम एवढे मोठे आहे की त्यांना गोव्याचे लोकमान्य टिळक म्हटले जाते. यानंतर दुसरा कालखंड म्हणजे बा.भ.बोरकर, शंकर रामाणी, इत्यादी कवीचा येतो. कवी दामोदर अच्युत कारे यांची कविताही गोमंतकीय मराठी कवितेत महत्वाची मानली जाते. याच्याबरोबर मराठीमध्ये कथा, कविता, कांदबरी लेखन भरपूर झालेले दिसते. गोमंतकीय मराठी साहित्याला खरा बहर आला तो गोव्याच्या मुक्तीनंतर कथा, कविता, कांदबरी आत्मचरित्र,चरित्र, प्रवासवर्णन, नाटक, या सर्वच वाङमय प्रकारातून उंदड साहित्य निर्मिती झाली. गोपाळराव मयेकर, गजानन रायकर, अवधूत कुडतरकर, नरेद्र बोडके, लक्ष्मणराव सरदेसाई, लक्ष्मीकांत भेब्रें, उषा पाणदीकर, मनोहर हिरबा सरदेसाई, सुदेश लोटलीकर, रविंद्र घवी, सोमनाथ कोमरपंत, दीपक पाणंदीकर, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, विष्णू वाघ या सर्वाची साहित्यसेवा विपूल प्रमाणात आहे. अतिशय छोट्या प्रांत असलेल्या गोव्याला अनेक साहित्यक लाभलेले आहेत. आता युवा पिढिपण भरपूर लिहिते. गोव्यात कोंकणी बरोबर मराठीला प्राधान्य दिलेल्या आहेत. यापुढेही मराठी साहित्य भरपूर प्रमाणात लिहिले जाईल. मॅडम आमच्या मुलाखातीसाठी आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद!