सदस्य:T. D. Rajgure/dhulpati
कारंजा लाड हे शहर श्रीदत्तात्रय अवतार श्रीन्रुसिह सरस्वती स्वामी यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सदर शहराला पौराणिक वारसा असल्याचा उल्लेख स्कंद पुराणातील पातालखंडाच्या आठव्या व नवव्या आध्याया मध्ये असल्याचे दिसून येते . मध्य युगीन काळात सदरा शहर मोगली प्रेदेशात सामावलेले असल्यामुळे शिवाजी महाराजांनी लुटल्याचा उल्लेख मिळतो . त्यामुळेच सदर शहराला परकोट बांधून चार वेशी निर्माण करण्यात आल्यात. ब्रिटीश काळात भारतातील सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती येथेच स्थापन करण्यात आली. या सर्व बाबींमुळे सदर शहराला महत्व प्राप्त झाले. अशा महत्व्पूर्ण शहराचे महत्व टिकून राहले तसेच येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवन पुढील पिढीला अभ्यासता यावे. या हेतूने इन्नाणी महाविद्यातील इतिहास विभागाद्वारे इ.स.२००४ ला ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. सदर वस्तू संग्रहालयामध्ये प्राचीन ते आधुनिक काळातील भारतीय नाणी, विदेशी नाणी मिळून २१३ नाणी अभ्यासा करीता उपलब्ध आहेत. या शिवाय दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या विविध धातूंचे २७६ साहित्य अभ्यासावयास उपलब्ध आहेत. सदर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामुळे परिसरातील विध्यार्यांना व नागरिकांना इतिहासाचे अवलोकन करणे, समजून घेणे सोईचे झाले आहे. सदर वस्तू संग्रहालयास भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देवीसिंह शेखावत, बेल्जियम येथील डीआरएस टील्लो डेटीज, केनिया येथील अजमल पठाण, कोरिया डॉ. किम ईत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्यात.