लठ्ठपणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी एम आय ३० पेक्षा अधिक असलेली एक लठ्ठ व्यक्ती

शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मेद असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात.[१] जागतिक आरोग्य संघटनेनुसार बॉडी मास इंडेक्स ३० च्या वर असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे हे लठ्ठपणामागचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुणार भारतीय व्यक्तीनी अनेक रोग टाळण्यासाठी त्यांचा बी एम आय हा २५ किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. लठ्ठपणामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते जसे की हृदयरोग आणि धमन्यांचे आजार, मधुमेह, झोपताना श्वास बंद पडणे, काही प्रकारचे कॅन्सर आणि मनोऔदासिन्य.[२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Obesity and overweight". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2018-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Lancet". www.thelancet.com. 2018-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ Zitman, Frans G.; Penninx, Brenda W. J. H.; Cuijpers, Pim; Stijnen, Theo; Bouvy, Paul F.; Wit, Leonore M. de; Luppino, Floriana S. (2010-03-01). "Overweight, Obesity, and Depression: A Systematic Review and Meta-analysis of Longitudinal Studies". Archives of General Psychiatry (इंग्रजी भाषेत). 67 (3): 220–229. doi:10.1001/archgenpsychiatry.2010.2. ISSN 0003-990X.