Jump to content

अरुणकुमार लखानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुणकुमार लखानी हे नागपूर येथील ऑरेंजसिटी वॉटरचे (लघुरूप:ओसीडब्ल्यू)मुख्य प्रवर्तक व विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य व्व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते नागपूर शहरात मागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने २४X७ हा पाणीपुरवठा(दिवसाचे २४ तास व असे आठवड्याचे सातही दिवस) पाणीपुरवठा योजना राबवित आहेत. या योजनेद्वारे नागपुरातील सुमारे २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास १८ लोकांना या योजनेचा थेट फायदा झाला आहे.हा प्रकल्प गेल्या सुमारे सहावर्षांपासून टप्प्या-टप्प्याने नागपुरात कार्यरत होत आहे.

नागपूर शहरात ही २४X७ योजना राबविणे अत्यंत जिकरीचे व किचकट काम आहे.जून्या व गंजलेल्या(जंगलेल्या) पाणीपुरवठा लाईन्स काढून अथवा त्या चांगल्या असल्यास त्याचा वापर करून, एचडीपीसी पाईप वापरून ही योजना कार्यान्वीत केली जात आहे.

नागपुरातील १५ कोटी लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी महाजेनकोच्या कोराडी व खापरखेडा विद्युत प्रकल्पास देण्यात येते. त्यामुळे, नागपूर शहरास पेयजल पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणातील, महाजेनकोस देण्यात येणाऱ्या १५ कोटी लिटर पाण्यास पर्याय निर्माण होतो.महाजेनकोने ते पेंच धरणातील न वापरलेले पाणी नागपुरातील पेयजलासाठी वळवण्यात येऊ शकते.

हे नागपुरचे मॉडेल भारतातील सुमारे १०० शहरात राबविण्याचा भारताच्या नीती आयोगाचा विचार आहे.[ संदर्भ हवा ]

धारण केलेली पदे

[संपादन]
  • बीआरएलएफचे अध्यक्ष
  • महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष
  • विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या कौशल्यविकासावर काम करणाऱ्या ऋणाधार ट्रस्टचे अध्यक्ष
  • वनवासी भागात ५०० पेक्षा जास्त एकल विद्यालये चालविणाऱ्या मानकर ट्रस्टचे अध्यक्ष

पुरस्कार

[संपादन]
  • 'वर्ल्ड सीएसआर डे' या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीचा 'वन ऑफ ५० मोस्ट पॉवरफुल लीडर्स इन वॉटर मॅनेजमेंट' हा पुरस्कार.